Sun, Jul 21, 2019 16:52
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › सत्ता टिकवण्यासाठी लागतात सक्रिय लोकप्रतिनिधी : नितिशकुमार 

सत्ता टिकवण्यासाठी लागतात सक्रिय लोकप्रतिनिधी : नितिशकुमार 

Published On: Apr 15 2018 1:34AM | Last Updated: Apr 15 2018 1:34AMबंगळूर : प्रतिनिधी

जनतेचे सेवक म्हणून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी सत्ता भोगण्यापेक्षा जनतेसाठी सतत कार्यरत राहिले तरच सत्ता टिकून राहील, अन्यथा हातातील सत्ता जाण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिला आहे. 

नुकताच बंगऴूर दौर्‍यावर कर्नाटक विधानसभेच्या एकूण 224 जागांपैकी संयुक्‍त जनता दल 30 जागा लढविणार असून कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर समझोता करणार नाही. स्वतःच्या बळावरच ही निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संयुक्त जनता दलाने बिहारमधील सत्ता हस्तगत करण्याकरिता भाजपबरोबर हातमिळवणी केली आहे. राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस महागठबंधनमधून बाहेर पडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे जनतेचे ट्रस्टी असतात हे ओळखूनच त्यांनी कार्यरत राहिले पाहिजे. जनतेची सेवा करण्यास विसरू नका तरच जनतेचा तुमच्यावर विश्‍वास राहील. बिहारमध्ये संयुक्त जनता दलाने सेवाभाव समोर ठेवून कार्य सुरू केले आहे. त्याचा स्वीकार जनतेने केला आहे. भ्रष्टाचार, सामाजिक सलोखा व गुन्हेगारीविरुध्द लढा बिहार सरकारने आपले ब्रीद ठरवून कार्य सुरू केले आहे, असे कुमार म्हणाले. 

जनतेला न्याय देण्यासाठी आपण गेल्या 12 वर्षांपासून कार्यरत आहे. जनतेची सामाजिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपण सतत कार्यरत राहिले पाहिजे. सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षक पध्दतीमध्ये सुधारणा केली पाहिजे. मुलींना न्याय देण्यासाठी मॅट्रिकनंतर त्यांचे उच्च शिक्षण होण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे कुमार म्हणाले.

Tags : Active , Representatives Need, Keep Power,: Nitish Kumar