Sun, Aug 25, 2019 23:27होमपेज › Belgaon › पोलिस वाहनालाही झटका

पोलिस वाहनालाही झटका

Published On: Jan 20 2018 1:38AM | Last Updated: Jan 20 2018 12:15AMबेळगाव : प्रतिनिधी

शहरात वाहनांच्या पार्किंगला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिस  विभागाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. नो पार्किंगच्या ठिकाणी व वाहतुकीला अडथळा करणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. एरव्ही खासगी वाहनांवर कारवाई करणार्‍या रहदारी पोलिस खात्याने शुक्रवारी  आपल्याच खात्याच्या वाहनावर कारवाई केली.

नरगुंदकर भावे चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. या ठिकाणी वाहनांची नहमीच मोठी गर्दी होते. या ठिकाणी शुक्रवारी दुपारी पोलिस खात्याचे वाहन भररस्त्यावर लावण्यात आले होते. दरम्यान, या वेळेत सेवेत असणार्‍या वाहतूक नियंत्रण पोलिसाने वाहनाला लॉक करुन नियम सर्वांना सारखेच असतात हेच दाखवून दिले.