Mon, Jul 15, 2019 23:37होमपेज › Belgaon › पीएनबी प्रकरणातील सूत्रधारांची माहिती देऊनही कारवाई नाही

पीएनबी प्रकरणातील सूत्रधारांची माहिती देऊनही कारवाई नाही

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 19 2018 1:24AMबंगळूर : प्रतिनिधी        

पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) हजारो कोटींना फसवणूक प्रकरणातील सूत्रधार नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांच्याबाबत बंगळूर येथील एका उद्योजकाने 2015 मध्येच राज्य आणि राष्ट्रीयस्तरावरील काही तपासणी पथकांना माहिती दिली होती, असे उघडकीस आली आहे.

नीरव व मेहुल यानी केवळ पंजाब नॅशनल बँकच नव्हे तर माझ्यासह देशातील अनेक शहरातील शेकडो उद्योजकांची दागिन्यांच्या व्यवसायात मोठे लाभ मिळवून देण्याचे सांगून फसवणूक केल्याचे येथील उद्योजक हरिप्रसाद यानी जाहीरपणे म्हटले आहे.

केवळ 20 ते 30 कोटींची मालमत्ता असलेल्या नीरव? मेहुल यांच्या कंपनीला बँकांनी 9872 कोटी रु.चे कर्ज देऊन औदार्य दाखविले आहे. याबद्दल आपण राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक शोधपथकांकडे तक्रार दिली तरी या पथकांनी दखल घेतली नसल्याची तक्रार उद्योजक हरिप्रसाद यानी केली आहे.