Mon, Jun 17, 2019 10:52होमपेज › Belgaon › कत्तलखाने, दुकानांची झाडाझडती

कत्तलखाने, दुकानांची झाडाझडती

Published On: Mar 06 2018 12:08AM | Last Updated: Mar 06 2018 12:07AMबेळगाव : प्रतिनिधी 

कत्तलखान्यांवरून राजकारण होत असल्याचा आरोप झाल्यानंतर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने सोमवारी शहरातील कत्तलखाने आणि मांसविक्री दुकानांची झाडाझडती घेतली. ही कारवाई करताना कसाई गल्ली परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात केल्याने मुख्य बाजारपेठेत काही काळ तणाव होता.

केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या दौर्‍यानंतर बेळगावातील कत्तलखान्यांचा विषय ऐरणीवर आला आहे.  मनपा आयुक्त शशीधर कुरेर यांनी सोमवारी कसाई गल्लीतील मांसविक्री दुकानांची माहिती घेतानाच त्या ठिकाणी जनावरे कापू नयेत, विनापरवाना मांस विक्री करू नये, कॅम्पमधील कत्तलखान्यात कापलेल्या जनावरांचेच मांस विका, अशा सूचना दिल्या. नियमभंग करणार्‍यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. कुरेर यांनी शनिवारी कसाईगल्लीत कत्तलखाने चालवणार्‍यांना नोटिस बजावल्या होत्या.

कसाई गल्ली आणि कॅम्प कत्तलखाने आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे दाटीवाटीच्या वसाहतीमधील कत्तलखान्यांविरोधात सातत्याने तक्रारी सुरु आहेत. त्यातूनच ऑटोनगरमधील कोल्ड स्टोरेज विरोधात तक्रार झाली. तर मांस विक्री दुकानांमधील स्वच्छतेबद्दलही तक्रारी आहेत.

कसाई गल्ली परिसरात वाढती गर्दी

कसाई गल्ली परिसरात पाहणीदरम्यान बघ्यांची गर्दी वाढली. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ते अडवले होते. त्यामुळे काही काळ तणाव वाढला. पोलिस उपायुक्त महानिंग नंदगावी, सीमा लाटकर, मनपा आरोग्यधिकारी डॉ.शशिधर नाडगौडा,नगरसेवक बाबुलाल मुजावर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. सुरवातील  विक्रेत्यांनी त्यांना गराडा घातला. पण पोलिसांनी मार्ग मोकळा करून दिला.
चार बीफ दुकाने विनापरवाना

कसाई गल्लीतील 8 बीफ दुकानदारांकडे परवाना होता. पण 4 दुकानदारांकडे परवाना नसल्याचे निर्दशनास आले. त्या चार दुकानदारांना दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला.
कोल्ड स्टोरेजबद्दल 14 जणांची चौकशी