Wed, May 22, 2019 16:42होमपेज › Belgaon › शिक्षकांचे सुधारित वेतन जमा

शिक्षकांचे सुधारित वेतन जमा

Published On: Jul 23 2018 1:07AM | Last Updated: Jul 23 2018 12:10AMबेळगाव : प्रतिनिधी

शिक्षकांचे सुधारित वेतन शिक्षण खात्याने शुक्रवारी (ता.20) जमा ट्रेझरीमध्ये जमा केले असून अन्य शिक्षकांचे संबंधित बँकातून सोमवारी (दि.23) व मंगळवारी (ता.24) जमा होणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकार्‍यांनी माहिती दिली. 

अनेक शिक्षकांच्या नजरा सुधारित वेतनाकडे लागून होत्या. प्रत्येकाला किती वाढ झाली आहे, याची उत्सुकता लागून राहिली आहे. एचआरएमसमध्ये तांत्रिक बिघाडामुळे वेतनाला उशीर झाला आहे. मात्र सदर प्रक्रिया पूर्ण झाली असून यापुढे शिक्षकांचे वेतन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहे. 

गत एप्रिलपासून वाढीव वेतन आणि आणि तेरा टक्के महागाई भत्ता कर्मचार्‍यांना मिळणार आहे. 43 टक्के महागाई भत्ता आणि 30 टक्के वेतन वाढ द्यावी लागणार आहे. सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकारने 10,500 कोटींचा खर्च केला आहे. मागील सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या होत्या. त्यामुळे युती सरकारने अर्थखात्याची परवानगी घेऊन सुधारित वेतन देऊ केले आहे. त्यानुसार एप्रिल, मे  आणि जून महिन्यातील वाढीव वेतनची रक्कम एकाच वेळी जुलै महिन्यात जमा होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे.