Sat, Mar 23, 2019 16:05होमपेज › Belgaon › कर्नाटकात भाजप अव्वल; निजद किंगमेकर तर काँग्रेस...

कर्नाटकात भाजप अव्वल; निजद किंगमेकर तर काँग्रेस...

Published On: Apr 24 2018 1:05AM | Last Updated: Apr 24 2018 7:18AMबंगळूर : प्रतिनिधी

राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी केलेल्या निवडणूकपूर्व अंदाजानुसार भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा मिळवेल, तर काँग्रेस दुस़र्‍या स्थानावर असेल. तर नाईम्स नाऊच्या सर्वेनुसार काँग्रेस अव्वल राहील, तर भाजप दुसर्‍या स्थानी राहील. बहुतांशी पाहणींमध्ये निजद किंगमेकर ठरेल, असा अंदाज आहे.

राज्यातील सत्तारुढ काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री पदाचे उमेदवार सिध्दरामय्याच असतील, असे जाहीर करून प्रचार जोमाने चालविला असतानाच प्रदेश भाजपने प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा हेच भावी मुख्यमंत्री असतील, असे जाहीर करून प्रचाराला सुरुवात केली आहे.

मागील आठवड्यात अन्य एका खासगी वाहिनीने व्यक्त केलेल्या अंदाजात कोणताही पक्ष स्पष्ट बहुमत मिळविणार नाही. काँग्रेस प्रथम स्थानावर, भाजप द्वितीय व निजद किंगमेकरची भूमिका बजावेल, असे म्हटले होते. मात्र या अंदाजाच्या नेमका उलट अंदाज एबीपीने सोमवारी जाहीर केला आहे. या चॅनेलने निजदला  किंगमेकरच ठरविले आहे. मात्र सर्वाधिक जागा भाजप मिळविल.असे म्हटले आहे.

भाजपला 89 ते 95 जागा, काँग्रेस? 85 ते 91 तर निजद 32 ते 38 जागा मिळविल. प्रथम किंवा द्वितीय स्थानावरील पक्षाला सरकार स्थापनेच्या कार्यात निजदची मदत मिळेल, अर्थात निजद हाच किंगमेकर बनेल, असेच म्हटले आहे.  

 

Tags : belgaon, belgaon news, Karnataka Assembly Elections, national news channels pre poll, BJP, highest seats,