Sun, May 26, 2019 08:58होमपेज › Belgaon › वर्‍हाडी टेम्पो उलटून ११ जखमी

बेळगाव परिसर, जिल्ह्यात अपघातसत्र

Published On: Apr 20 2018 1:17AM | Last Updated: Apr 20 2018 12:55AMबेळगाव ः प्रतिनिधी

विवाह समारंभ संपवून पतरणार्‍या  वर्‍हाडी टेम्पोला अपघात होेऊन अकरा जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.19) सायंकाळी कित्तूरजवळ घडली.

एम.के. हुबळी येथून तेगूर येथे विवाह समारंभासाठी हे वर्‍हाडी गेले होते. परत येत असताना कित्तूरजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला. मंजुनाथ सूरज कडकोळ (वय 13), शांतव्वा सकरेन्‍नावर (34), बाबू सकरेन्‍नावर (40), शोभा रुद्रापा तोरगल (31), महादेव करेन्‍नावर (40), नेत्रा तोरगल (10),  रुद्रव्वा मेळवनकी (45), महादेवी बसाप्पा कडकोळ (30), कल्‍लाप्पा माळगी (42), स्नेहा तोरगल (10), बसाप्पा कडकोळ (47), सर्वजण रा. एम.के . हूबळी व हुनशीकट्टी येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अलतग्याजवळ पती-पत्नी जखमी

बेळगावकडून अगसगेला जाणार्‍या दुचाकीला सीआरपीएफच्या वाहनाने धडक दिल्याने दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी अलतगा फाट्यावर घडली. काव्या इरय्या मास्तमर्डी (वय 20), इरय्या शेखरय्या मास्तमर्डी (24, दोघही रा. अगसगे) अशी जखमींची नावे आहेत. 
हे दाम्पत्य सुळेभावी येथे साखरपुड्याचा कार्यक्रम संपवून अगसगेला परत जात होते. अलतगा मोरी जवळ येत असताना बेळगावकडे जाणार्‍या सीआरपीएकच्या वाहनाने धडक दिली. जखमी दाम्पत्याची दुचाकी व सीआरपीएफचे वाहन रस्त्याकडेला असणार्‍या शेतवडीत पलटी झाले.

ट्रक-दुचाकीच्या धडकेत दाम्पत्य ठार

मंगसुळीपासून एक कि.मी. अंतरावर उगार क्रॉसजवळ ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात जालिगेरी (ता. जि. विजापूर) येथील दाम्पत्य जागीच ठार झाले. गुरुवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रूपसिंग आंबू राठोड (वय 38) आणि त्याची पत्नी आनसाबाई (35) अशी मृतांची नावे आहेत. रूपसिंग व आनसाबाई राठोड हे पेठवडगाव (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील रासायनिक खताच्या कंपनीत मजूर म्हणून काम करीत होते.

जालिगेरीमध्ये मोठी यात्रा भरत असल्याने यात्रेसाठी ते गावी आले होते. यात्रा संपवून दुचाकीवरून पेठवडगावकडे परत जात असताना मंगसुळीजवळ उगार रस्त्याच्या क्रॉसवर कागवाडहून अथणीकडे जाणार्‍या ट्रकने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने दांपत्य ट्रकखाली सापडले. त्यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला होता.  अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केले. दुचाकीवरील संसारोपयोगी वस्तू व खाद्यपदार्थ विखुरले गेले. कागवाड पीएसआयने पंचनामा करून ट्रक व दुचाकी कागवाड पोलिस ठाण्यात नेली. दाम्पत्याच्या मागे सागर (20), संदीप (15) अशी दोन मुले आणि कन्या सावित्री (10) असा परिवार आहे.