Sat, Feb 16, 2019 08:45होमपेज › Belgaon › अनंतकुमार यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

अनंतकुमार यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

Published On: Apr 19 2018 1:34AM | Last Updated: Apr 18 2018 11:54PMहुबळी: प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या ताफ्यातील वाहनाला पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हालगेरी गावाजवळ एका भरधाव ट्रकने चुकीच्या बाजूने येऊन जोरदार ठोकर दिली. त्यामध्ये मंत्र्यांचा कर्मचारी गंभीर जखमी आहे. मात्र, मंत्र्यांनी हा आपल्या खुनाचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

या ट्रकद्वारे आपल्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला, असे हेगडे म्हणाले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी दिलेला असून आयजीपीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. या निर्णयाचे स्वागत हेगडे यांनी केले असून यापूर्वीसुद्धा काही संघटनांनी आपला खून करण्याचा प्रयत्न केला होता, असाही दावा केला. 

चुकीच्या बाजूने भरधाव असलेल्या ट्रकने आपल्या एस्कॉर्ट वाहनाला जोरदार ठोकर दिली. राज्य सरकारने या प्रकरणामागील सत्य शोधून काढावे, अशी मागणीही त्यांनी केली.