Thu, Sep 20, 2018 20:17



होमपेज › Belgaon › खानापूरजवळ अपघात; सिंगिनकोपचे दोघे ठार

खानापूरजवळ अपघात; सिंगिनकोपचे दोघे ठार

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 12:19AM



खानापूर : प्रतिनिधी

बेळगाव-खानापूर महामार्गावरील वासकरवाडी क्रॉसनजीक भरधाव ट्रकने समोरुन येणार्‍या दुचाकीला उडविल्याने सिंगिनकोप (ता. खानापूर) गावचे दोन तरुण जागीच ठार झाले. गिराप्पा बसवाणी पाटील (25) आणि दयानंद फकिरा पाटील (17) अशी तरुणांची नावे आहेत. आज रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर पलायन करणार्‍या ट्रकला तब्बल 30 कि.मी. अंतरावर बिडीनजीक पकडण्यात नंदगड पोलिसांना यश आले. ऐन पांडुरंग हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या या दु:खद घटनेने सारा गाव शोकसागरात बुडाला आहे.

सोहळा पुढे ढकलला...

गिराप्पा व दयानंद सायंकाळी खानापूरला आले होते. बाजार आटोपून दुचाकीवरुन घरी परतत असताना वासकरवाडी क्रॉसनजीक अचानक समोरुन येणार्‍या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. दयानंद हा इदलहोंडमधील पदवीपूर्व महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकत होता. आजही तो खानापूरला येऊन पेपर देऊन गेला होता. त्याच्या पश्‍चात आई, वडील, बहिण, भाऊ असा परिवार आहे. तर गिराप्पा हा अविवाहित असून त्याच्याही पश्‍चात आई, वडील, भाऊ व बहिण असा परिवार आहे. पारायण सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक मोतीलाल पवार व उपनिरीक्षक संगमेश होसमणी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान आ. अरविंद पाटील यांनीही अपघातस्थळी भेट देऊन पोलिसांना सहकार्य केले.