Sun, Jul 21, 2019 12:04होमपेज › Belgaon › अभय पाटील, अ‍ॅड. बेनके, हलगेकर भाजपचे उमेदवार

अभय पाटील, अ‍ॅड. बेनके, हलगेकर भाजपचे उमेदवार

Published On: Apr 21 2018 12:59AM | Last Updated: Apr 21 2018 12:08AMबेळगाव, बंगळूर : प्रतिनिधी

बहुप्रतिक्षित भाजपची तिसरी यादी शुक्रवारी जाहीर झाली. तीत बेळगाव दक्षिणमधून माजी आमदार अभय पाटील यांना, तर बेळगाव उत्तरमधून अ‍ॅड. अनिल बेनके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. चुरशीच्या खानापूर मतदारसंघातून विठ्ठल हलगेकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. काल गुरुवारीच समाजमाध्यमांवरून या नेत्यांची उमेदवारी काहींनी जाहीर केली होती. आज त्यावर शिक्‍कामोर्तब झाले.बेळगाव दक्षिणमधून पांडुरंग धोत्रे आणि सुनील चौगुले हेही इच्छुक होते. तर बेळगाव उत्तरमधून किरण जाधव    आणि डॉ. रवी पाटील इच्छुक होते. पैकी किरण जाधव गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवारही होते. आता त्यांची भूमिका काय असणार, याकडे आता लक्ष आहे. 

पटील आणि अ‍ॅड. बेनके यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे काही जणांनी सांगण्यास सुरवात केल्यानंतर काही संतप्त कार्यकर्त्यांनी खासदार सुरेश अंगडी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. त्यामुळे भाजपच्या दोन गटांत असंतोष असल्याचे स्पष्ट झाले होते. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही मतदारसंघातील प्रचार मोहिमेवर आता कार्यकर्त्यांचे लक्ष असेल.गेल्या आठ दिवसांपासून तालुक्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेली भाजपची खानापूरची उमेदवारी तोपिनकट्टी येथील श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक आणि भाजपचे जिल्हा निमंत्रित सदस्य विठ्ठल हलगेकर यांना मिळाली. उमेदवारीसाठी तब्बल 23 जणांनी अर्ज केले होते.

Tags : Belgaum, Abhay Patil, Adv, Benke, Haggaekar, BJP, candidate