Thu, Jan 24, 2019 05:39होमपेज › Belgaon › सलग सुट्ट्यांमुळे एटीएम ‘कॅशलेस’

सलग सुट्ट्यांमुळे एटीएम ‘कॅशलेस’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

गुरुवार दि. 29, शुक्रवार दि. 30 अशी सलग दोन दिवस सुट्टी त्यानंतर शनिवार दि. 31  एप्रिल रोजी वर्किंग डे अन् यानंतर पुन्हा रविवार दि. 1 रोजी सप्ताहिक सुट्टीचा दिवस. यामुळे शहरातील बँकांच्या बहुतांश एटीएममध्ये शनिवारी रात्रीपासूनच खडखडाट होता. रविवारी संपूर्ण दिवसभर  बहुतांश एटीएममधील पैसे संपल्याने नागरिकांना नाराज होऊन परतावे लागले. 

गुरुवारी महावीर जयंती, शुक्रवारी गुड फ्रायड यानंतर रविवारी सप्ताहिक सुट्टी होती. एटीएममध्ये अगोदर भरलेले पैसे संपुष्टात आले. मार्च एंडींगच्या धावपळीत नव्याने एटीएममध्ये पैसे भरण्यास बँक प्रशासनाला सवडच मिळाली नाही का, अशा प्रतिक्रिया ग्राहकांतून उमटत होत्या. 

समादेवी गल्ली येथील कार्पोरेशन बँकेच्या एटीएमवर, कोर्ट येथील एसबीआय, बँक ऑफ इंडिया, रामदेव हॉटेलशेजारील युनियन बँक एटीएम  सेंटरवर रविवारी सकाळपासूनच ‘नो कॅश’ असे फलक लटकविण्यात आले होते. काही एटीएमचे शटर डाऊन करण्यात आले होते. खडेबाजार येथील सारस्वत बँकेच्या एटीएमवर व लक्ष्मीटेक येथील अ‍ॅक्सीस बँकेच्या एटीएमवर अशीच परिस्थिती दिसून आली. शहरातील प्रमुख बाजारपेठ खडेबाजारातील एटीएम बंद असल्याने बाहेरून आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. स्थानिक नागरिकांकडून एटीएमचा मोठा वापर झाल्याने बाहेरच्या लोकांना पैसे न मिळाल्याने रिकाम्या हाती गावी परतावे लागले.


  •