Thu, Jul 18, 2019 00:09होमपेज › Belgaon › एपीएमसी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड ऑक्टोबरमध्ये

एपीएमसी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड ऑक्टोबरमध्ये

Published On: Jul 12 2018 1:40AM | Last Updated: Jul 11 2018 10:09PMबेळगाव : प्रतिनिधी

एपीएमसी अध्यक्ष-उपाध्यक्षाचा कार्यकाल सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येणार आहे. मात्र निवडणूक ऑक्टोबरमध्ये होईल. वीस महिन्यासाठी अध्यक्षपद असते. त्यानंतर नूतन अध्यक्षाची निवड करण्यात येते. एपीएमसीवर काँग्रेस, भाजप व समितीचे सदस्य निवडून आले आहेत. मात्र काँग्रेसचे संख्याबळ अधिक असूनही आपसातील वादामुळे एपीएमसीवर भाजप, काँग्रेस सदस्यांनी  एकत्र येऊन अध्यक्षपदाची माळ गळ्यात पाडून घेतली. आता अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार आहे. त्यासाठी कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींच्या बैठका घेऊन चर्चा होत आहे. पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी गाठीभेटी वाढल्या आहेत. एपीएमसीत काँग्रेसमध्ये वाद धुसफुसत आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी एक गटाने अन्य सदस्यांशी चर्चा चालवली आहे. अध्यक्षपदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

एपीएमसीत शेतकरी, व्यापार्‍यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी शेतकरी आपल्या विभागातून सदस्यांची निवड करतात. मात्र काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा अन्य सदस्यांना जाळ्यात ओढून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मागील अध्यक्षपद थोडक्यात हुकले आहे. कारण काँग्रेसची एक हाती सत्ता एपीएमसीवर होती. मात्र एकमेकांमध्ये अंतर्गत वादामुळे अध्यक्षपदासाठी समान मतदान झाले. त्यामुळे अध्यक्ष निवड चिठी टाकून करण्यात आली होती. यात बेळगुंदी विभागाचे निंगाप्पा जाधव यांनी बाजी मारली. उपाध्यक्षपदाची माळ भाजपच्या रेणुका पाटील यांच्या गळ्यात पडली. एपीएमसीवर पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी एपीएमसीवर मराठीची सत्ता होती. मात्र समितीच्या नेत्यांची दोन गटात विभागणी झाली. त्यामुळे संख्याबळ कमी झाले आहे.