Thu, Apr 25, 2019 21:41होमपेज › Belgaon › हल्लेखोराची कसून चौकशी

हल्लेखोराची कसून चौकशी

Published On: Mar 09 2018 1:33AM | Last Updated: Mar 09 2018 12:22AMबंगळूर : प्रतिनिधी

तेजराज मानसिकद‍ृष्ट्या अस्वस्थ होता, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यातूनच त्याने हे कृत्य केले असण्याची शक्यता आहे. तेजराजला बेड्या घातलेल्या अवस्थेत तुमकूरला नेण्यात आले आणि त्याच्या भाडोत्री घराची झडती घेण्यात आली. तेथे मनस्वास्थ्यावरची पुस्तके पोलिसांना सापडली. पोलिसांनी या पुस्तकांबद्दल तेजराजकडे चौकशी केली. पण, त्याने काहीच माहिती दिली.

त्या भाडोत्री घरात तेजराज किती वर्षांपासून राहतो, आधीचे त्याचे वागणे विक्षिप्त होते का असे प्रश्‍न घरमालकाला विचारण्यात आले. पोलिसांचे 9 जणांचे पथक चौकशीसाठी बंगळूरहून तुमकूरला गेले आहे.वकिलांचा बहिष्कारवकील संघटनेने गुरुवारी लोकायुक्‍तांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील दिवाणी न्यायालय आवारामध्ये धरणे सत्याग्रह करत राज्य सरकारने राज्यातील सर्वच न्यायाधीशांना व वकिलांना पुरेसे संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. 

हल्लेखोर तेजराज शर्माला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. मल्ल्या इस्पितळ्यातील डॉ. दिवाकर यांनी न्या. विश्‍वनाथ शेट्टी यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले.