होमपेज › Belgaon › पाठ्यपुस्तकांचा 98 टक्केपुरवठा

पाठ्यपुस्तकांचा 98 टक्केपुरवठा

Published On: Aug 25 2018 1:13AM | Last Updated: Aug 24 2018 7:53PMबेळगाव : प्रतिनिधी

शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचा  पुरवठा करण्याची शिक्षण खात्याची घोषणा हवेतच विरली आहे. ऑगस्ट संपत आला तरी 2 टक्के पुस्तके येणे शिल्लक आहे. मराठी माध्यमातील सहावीचे गणित व पहिली ते चौथीपर्यंची कन्नड पुस्तके आठवड्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी खात्याच्या कार्यालयीन सूत्राने दिली. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासाठी मोफत पुस्तके 18,73,827 आणि विक्रीसाठी 6,20,771 पाठ्यपुस्के असून  एकूण 24,94,598 पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. शिक्षण खात्याने सीबीएसई अधारित अभ्यासक्रम सुरू केला आहे. यामुळे खात्याने अभ्यासक्रमात बदल सुरू केला आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीमुळे पाठ्यपुस्तकांच्या छपाईवर परिणाम झाला आहे. इंग्रजी व  कन्नड माध्यमांची पाठ्यपुस्तके पूर्ण आली आहेत.  मराठी पुस्तके येणे बाकी आहे. आठवडाभरात सर्व पुस्तके उपलब्ध होतील. 2017-18 च्या बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा दहावीच्या निकालात वाढ झाली आहे. त्यामुळे विषय शिक्षकांसमोर आव्हान उभे आहे. निकालवाढीसाठी शिक्षण खाते नवनवीन उपक्रम राबवित आहे. यामध्ये विषय शिक्षकांच्या कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.  

शिक्षण खात्याने यंदा आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके पुरवण्यात आली. याचे  शुल्कही भरले आहे. यंदाही मराठी माध्यम विद्यार्थ्यांना विलंबाने पुस्तके मिळत आहेत. शिक्षण खात्याने पुढील वर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके देण्यासाठी आतापासून तयारी सुरू केली आहे. दहावी विषय शिक्षकांना निकालवाढीची सूचना करण्यात आली आहे. निकाल कमी लागल्यास विषय शिक्षकांवर कारवाई केली जाईल.