Mon, Apr 22, 2019 23:42होमपेज › Belgaon › चोरलेली ९५ लाखांची सोन्याची बिस्किटे जप्त

चोरलेली ९५ लाखांची सोन्याची बिस्किटे जप्त

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 19 2018 1:24AMबेळगाव : प्रतिनिधी

चोरीचे सोने विकण्यासाठी मुंबईहून बेळगावला आलेल्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून साडेतीन किलोंची सोन्याची बिस्किटेही जप्त करण्यात आली आहेत. त्यांची किमत 95 लाख रुपये होते. बेळगाव सीसीआयबी पोलिसांनी  शनिवारी रात्री ही कारवाई केली. मोहन प्रभाकर देवकर (वय 30, स रा.सी-15 डेमोटो कंपाऊंड, बांद्रा वेस्ट, मुंबई) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सागर हॉटेलनजीक शनिवारी रात्री 12.30 च्या सुमारास संशयास्पद फिरणार्‍या एका तरुणाला गस्तीवरील पोलिसांनी  बोलावून चौकशी केला असता, त्याने आपले नाव मोहन देवकर असे सांगितले. त्याच्याकडील बॅगेमध्ये बिस्किटाच्या आकारातील सोन्याचे 3 तुकडे आढळून आले. त्याचे वजन 3 किलो 50 ग्रॅम असून किंमत 95 लाख 15 हजार असल्याचे समजून येते. चौकशी केली असता त्या सोन्याची त्याच्याकडे कागदपत्रे नव्हती. शिवाय, सोने चोरबाजारपेठेत विक्रीसाठी नेत असल्याची कबुली मोहन याने दिल्याची माहिती पोलिस आयुक्तालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

सीसीबीआयचे पोलिस निरीक्षक ए. एस. गुदीकोप्प, एएसआय मुत्नाळ, कर्मचारी एस. आर. मेत्री, बी. एन. बागण्णावर, ए. एम. वडेयर, ए. के. कांबळे, बाळाप्पा इंगळगी, हरिश सोगलद यांनी ही कारवाई केली. माळमारुती पोलिसांत या प्रकरणाची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.

पंधरवड्यातील दुसरी मोठी

15 दिवसांपूर्वी निपाणी पोलिसानी कोगनोळीनजीक  60 लाखांची चांदी जप्त करून कारसह तिघांना अटक केली होती. हुपरीहून सेलम भागात कार्यरत असलेल्या सराफांना चांदीचे दागिने व विटा देण्यासाठी कारमधून हे तिघेजण जात होते. कारमधील सीटखाली चोरकप्यात काही बॅगांमध्ये चांदीचे तयार दागिने व विटा असा सुमारे 60 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर शनिवारी रात्रीची ही दुसरी मोठी कारवाई आहे.