Fri, Mar 22, 2019 05:34
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › जिल्ह्यात 95 पिंक मतदान केंद्रे

जिल्ह्यात 95 पिंक मतदान केंद्रे

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:12AMबेळगाव : प्रतिनिधी 

महिला मतदारांचा टक्का वाढावा यासाठी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच महिला मतदार केंद्र उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. या माध्यमातून अधिक महिला मतदार असणार्‍या मतदारसंघात महिला मतदान केंद्र उभारण्यात येत आहे. या मतदानकेंद्रामध्ये केवळ महिला कर्मचारीच निवडणूक कामकाज पाहणार आहेत. यासाठी या मतदान केंद्रांना पिंक मतदान केंद्र म्हणून ओळखले जात आहे. जिल्ह्यामध्ये अशा 95 मतदानकेंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. सदर मतदान केंद्रात महिला कर्मचारी मतदार केंद्राची जबाबदारी घेणार आहेत. 

जिल्ह्यातील अधिक महिला मतदार असणार्‍या विधानसभा मतदार संघामध्ये सदर पिंक मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये निपाणी 6, चिकोडी 6, सदलगा 6, अथणी 6, कागवाड 6, कुडची 6, रायबाग 6, हुक्केरी 6, अरभावी 6, गोकाक 6, यमकनमर्डी 1, बेळगाव उत्तर 5, बेळगाव दक्षिण 5, बेळगाव ग्रामीण 1, खानापूर 6, कित्तूर 5, बैलहोंगल 6, सौंदत्ती 6 आणि रामदुर्ग 6 अशाप्रकारे एकूण 95 पिंक मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. पिंक मतदान केंद्रात महिला कर्मचारीच कार्यरत असणार असून या ठिकाणी महिला कर्मचारीच काम पाहणार आहेत. प्रत्येक महिलेने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. महिला मतदारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या स्वीप समितीचे अध्यक्ष जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी रामचंद्रन यांनी दिली. 

Tags : Belgaum, 95, Pink, polling, stations, district