Tue, Feb 19, 2019 20:19होमपेज › Belgaon › कोगनोळीजवळ 10 लाख जप्त

कोगनोळीजवळ 10 लाख जप्त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

निपाणी  :  कोगनोळी टोलनाक्यानजीक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्थापन केलेल्या विशेष पोलिस चौकीच्या पथकाने गुरुवारी रात्री 10 च्या सुमारास बेहिशेबी 9 लाख 74 हजार रुपयांची रोकड जप्त केली. चौघांना तवेरा वाहनासह ताब्यात घेतले. 

टोलनाका चौकी येथे सीपीआय मुत्तण्णा सरवगोळ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार निंगनगौडा पाटील आणि सहकार्‍यांनी सापळा रचून ही कारवाई केली. कोल्हापूरहून गडहिंग्लजकडे चौघे एका बॅगमधून रोकड घेऊन जात होते. यातील रकमेची मोजदाद करून कागदपत्रांची मागणी केली. परंतु, त्यांच्याकडे ठोस कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी चौैघांना ताब्यात घेतले. 


  •