Mon, Nov 19, 2018 14:45होमपेज › Belgaon › ग्रामीण शाळा दुरुस्तीसाठी हवेत ९ कोटी 

ग्रामीण शाळा दुरुस्तीसाठी हवेत ९ कोटी 

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 10:59PMबेळगाव : प्रतिनिधी 

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सरकारी प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी 9 कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एन. महेश यांची गुरुवारी (दि.5) विधानसभेत भेट घेऊन केली.

ग्रामीण भागातील शाळांची अवस्था धोकादायक बनली आहे.  यामुळे येथील दुरुस्ती, काही वर्ग खोल्यांची नव्याने उभारणी आदी कामे तातडीने करण्याची गरज आहे. धोकादायक इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे.  शिक्षण खात्याकडे यापूर्वीही दुरुस्तीसाठी सातत्याने मागणी केली होती. जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांना भेटून सर्व माहितीचा अहवाल दिला आहे. ग्रामीण भागातील कर्ले, बाकनूर, बिजगर्णी, जानेवाडी, कावळेवाडी, बेळगुंदी संतीबस्तवाड, मुतगे, सांबरा आदी ठिकाणच्या शाळांची दुरुस्ती करायला हवी. 

ग्रामीण मतदारसंघातील मराठी, कन्नड व ऊर्दू शाळांच्या इमारती धोकादायक आहेत. यासाठी तातडीने अनुदान मंजूर करा, अशी मागणी आ. हेब्बाळकर यांनी केली. मंत्री महेश यांनी मागणीचा विचार करून निधीची तरतूद करण्याची ग्वाही दिली.