Thu, Jun 20, 2019 20:42होमपेज › Belgaon › यंदा तब्बल ८२ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्‍त 

यंदा तब्बल ८२ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्‍त 

Published On: May 20 2018 1:41AM | Last Updated: May 20 2018 12:06AMबंगळूर : प्रतिनिधी

राज्य विधानसभा निवडणूक लढविलेल्या प्रत्येक 10 उमेदवारांपैकी  8 उमेदवारानी डिपॉझिट गमाविले आहे. अपक्ष 1129 उमेदवारांपैकी 1114 उमेदवारांना डिपॉझिट परत मिळालेले नाही अर्थात त्यांचे डिपॉझिट  जप्त झाले आहे.तसेच  एस.पी. (24) निजद (28), शिवसेना (37) व आप (28) उमेदवारांची परिस्थिती यापेक्षा काही वेगळी नाही.  डाव्या पक्षातून रिंगणात उतरलेल्या 23 पैकी केवळ एक उमेदवार आपले डिपॉझिट राखून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवाराचे डिपॉझिट जप्त न होता त्याला परत मिळायचे असल्यास मतदान झालेल्या संख्येच्या एक षष्ठांश मते उमेदवाराला मिळाली पाहिजेत. मात्र इतकी मते मिळविण्यात यंदाच्या निवडणुकीत 82 टक्के उमेदवार अपयशी ठरले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी सामान्य उमेदवारांना 10 हजार रु. व अनुसूचित जाती? जमातीच्या उमेदवाराना 5 हजार रु. अशी अनामत रक्कम असते. यंदाच्या निवडणुकीत 222 मदारसंघात 2844 उमेदवार रिंगणात होते. 2,337  उमेदवारांनी ( 82.2 टक्के ) डिपॉझिट गमाविले आहे. 

कांही वर्षांपूर्वी ही रक्कम अत्यंत कमी होती. 1996 च्या निवडणुकीत तब्बल 456 उमेदवारांनी एकाच मतदार संघातून अर्ज भरल्यामुळे अनामत रक्कम वाढविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. उमेदवारांची संख्या कमी करण्याचा हा एक मार्ग होता.