Tue, Jan 28, 2020 21:39होमपेज › Belgaon › बेळगावात 8 आलिशान कारना आग

बेळगावात 8 आलिशान कारना आग

Published On: Jan 18 2018 1:48AM | Last Updated: Jan 17 2018 11:42PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

जाधवनगर, विनायकनगर, तसेच शरकत पार्क परिसरातील 8 मोटारींना मंगळवारी मध्यरात्री आग लावण्यात आल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. 

जाधवनगर हा उच्चभ्रूंचा असून, अनेकांच्या कार आहेत. काही कार बंगल्यांच्या आवारत असतात, तर काही रस्त्याशेजारी. रस्त्याशेजारी लावण्यात आलेल्या इनोव्हा, व्हेंटो, व्हेर्णा, होंडा अशा 5 वाहनांना आग लावली गेली. स्विमिंगपूलजवळ  रस्त्याशेजारी लावलेल्या दोन, कत्ती बिल्डिंगसमोरील एक त्यापुढे काही अंतरावर चार कारना आगी लावल्या होत्या. त्यात दर्शनी भागाचे बरेचसे नुकसान झाले. काही कारमधील प्लास्टिक आणि रबर साहित्य जळून नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले. विनायकनगरात 1, तर शरकत पार्कजवळ 2 कारबाबतही हाच  प्रकार घडला.

माळमारुती पोलिसांना माहिती कळविण्यात आली. पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. समाजकंटकांचा शोध सुरू केल्याची माहिती कालीमिर्ची यांनी दिली आहे. एकाच माथेफिरूने हा प्रकार केल्याचा संशय पोलिसांना आहे.