Wed, Jul 17, 2019 07:59होमपेज › Belgaon › हम साथ नही, पर ७ है!

हम साथ नही, पर ७ है!

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 16 2018 10:57PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्याचा विधानसभा निकाल लागला असून जनमत चाचणीप्रमाणे विधानसभा त्रिशंकु झाली आहे. त्याप्रमाणे हालचाली सूरू झाल्या आहेत. 224 विधानसभा मतदार संघात 2,655 उमेदवार रिंगणात होते. यापैकी दोन जागांसाठी निवडणूक रद्द करण्यात आली होती.  222 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी राज्यातून 291 महिला उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. यापैकी फक्त 7 महिला उमेदवारांना  विजयी मिळविता आला.

यामध्ये निपाणी मतदारसंघातून भाजपच्या शशिकला जोल्ले,  बेळगाव ग्रामीणमधून काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर, खानापूरमधून काँग्रेसच्या अंजली निंबाळकर, गुलबर्गा उत्तरमधून काँग्रेसच्या के. फातीमा,  कारवारमधून भाजपच्या रुपाली नायक, हिरीयुरमधून भाजपच्या पौर्णिमा श्रीनिवास,  कोलार गोल्ड फिल्डमधून काँग्रेसच्या रुपा शशिधर या उमेदवार विजयी झाल्या. यामध्ये काँग्रेसच्या 4 तर भाजपच्या 3 महिला उमेदवार निवडून आल्या.

17 व्या विधानसभा निवडणूकीसाठी 2,436 पुरुष व 219 महिला उमेदवारांनी यंदाच्या निवडणूकीत नशिब आजमावले. यापैकी मूळबागिलू मतदारसंघातून सर्वाधिक 39  उमेदवार रिंगणात होते. 

बेळगाव जिल्ह्यातून पहिल्यांदाच 3 महिला आमदार निवडूण आल्या आहेत. यंदाच्या निवडणूकीत महिलांचा वाढता सहभाग दिसून आला. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने अनेक महिला उमेदवारांनी राजकारणात थेट सहभाग घेत निवडणूक लढविली. काँग्रेस पक्षाने लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर यांना दुसर्‍यांदा उमेदवारी दिली होती. पहिल्या निवडणूकीत पराभूत झालेल्या या दोन्ही उमेदवारांनी यावेळी बाजी मारली. शशिकला जोल्ले यांनी देखील दुसर्‍यांदा आमदारकीचा मान मिळविला. आ. जोल्ले यांनी 87006 मते घेतली. त्यांनी काँग्रेस उमेदवार काकासाहेब पाटील यांचा 8506 मतांनी पराभव केला.

लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 1,02,040 मते घेतली. त्यांनी भाजपचे संजय पाटील यांचा 51725 मतांनी पराभव केला. डॉ. निंबाळकर यांनी 35,061 मते घेतली. भाजपचे विठ्ठल हलगेकर यांचा 5080 मतांनी पराभव केला. के. फातिमा यांनी 64157 मते घेतली. भापचे चंद्रकांत पाटील यांचा 6313 मतांनी पराभव केला. रुपाली नायक यांनी 60,339 मते घेतली. निजदच्या आनंद असनोटीकर यांचा 14,64 मतांनी पराभव केला. पौर्णिमा श्रिनीवास यांनी 77733 मते घेतली. त्यांनी काँग्रेसचे डी. सुधाकर यांचा 12876 मतांनी पराभव केला. रुपा शशिधर यांनी 71151 मते घेतली.त्यांनी भाजपच्या अश्‍विनी संपगी यांचा 40827 मतांनी पराभूत केले.