Mon, Apr 22, 2019 04:13होमपेज › Belgaon › देशभरात सात कौशल्यविकास विद्यापीठे

देशभरात सात कौशल्यविकास विद्यापीठे

Published On: Jan 17 2018 1:56AM | Last Updated: Jan 16 2018 11:13PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी 

बेळगावमध्ये कौशल्य विकास केंद्र महाविद्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे. देशभरात  एकूण सात ठिकाणी अशा प्रकारची कौशल्ये विकास विश्‍वविद्यालयांची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी विविध ठिकाणी माहिती संग्रहित करण्यात येत आहे. असल्याची माहिती केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी दिली. 

कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून केंद्र सरकारने युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक जिल्हा केंद्रामध्ये कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्याच येईल. त्याशिवाय एकूण सात कौशल्य विकास विद्यापीठांची स्थापना करण्यात येणार असल्याचे हेगडे यांनी सांगितले. 

कर्नाटकामध्ये कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जनतेचा आणि युवकांचा अभिप्राय घेतला जात आहे. आयआयटीच्या धर्तीवर हे विद्यापीठ सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  याप्रसंगी भाजप महानगर अध्यक्ष राजेंद्र हरकुणी, राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल बेनके, महानगर उपाध्यक्ष मुरुघेंद्रगौडा पाटील, वल्लभ गुणाजी यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.