Wed, Jan 16, 2019 17:34होमपेज › Belgaon › श्रवणबेळगोळमध्ये महामस्तकाभिषेक सोहळ्यास ६५ लाख भाविकांची उपस्थिती

श्रवणबेळगोळमध्ये महामस्तकाभिषेक सोहळ्यास ६५ लाख भाविकांची उपस्थिती

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 26 2018 11:48PMश्रवणबेळगोळ : प्रतिनिधी 

श्रवणबेळगोळ येथील 88 व्या गोमटेश्वर भगवान श्री बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळा दि.17 ते दि.25 फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाला. या नऊ दिवसांच्या महोत्सवात देश विदेशातील सुमारे 65 लाख यात्रेकरूंनी सहभाग दर्शवला. ही माहिती स्वस्तिश्री चारूकिर्ती भट्टारक स्वामिजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वामिजी म्हणाले, राष्ट्रपतीच्या हस्ते शुभारंभ झालेल्या या महामस्तकाभिषेक सोहळ्यात 400 पेक्षा अधिक त्यागी गण उपस्थित होते हे या सोहळ्याचे वैशिष्ट़य म्हणावे लागेल. मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले. अजूनही लोकांचा दर्शनासाठी ओघ सुरूच आहे. महामस्तकाभिषेक महोत्सव हा सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाला आहे.  असंख्य स्वयंसेवक, सेवाभावी कार्यकर्ते, माध्यम प्रतिनिधी आणि केंद्र व राज्य सरकारचे सहकार्य लाभले आहे. उपराष्ट्रपती,पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल,  मुख्यमंत्री  आदिंनी  महामस्तकाभिषेक सोहळ्यात  सहभाग घेतला. दि. 12 जून रोजी या सोहळ्याची सांगता  होणार आहे. प्रत्येक रविवारी महामस्तकाभिषेक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राकृत विद्यापीठाचे कामकाज लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे असेही ते म्हणाले.यावेळी महोत्सव समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सरिता जैन, राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील, विनोद बाकलिवाल, दोड्डन्नावर व पदाधिकारी उपस्थित होते.