Wed, Nov 14, 2018 14:45होमपेज › Belgaon › जिल्ह्यातील ६४१ शाळांवर टांगती तलवार 

जिल्ह्यातील ६४१ शाळांवर टांगती तलवार 

Published On: Aug 04 2018 1:32AM | Last Updated: Aug 03 2018 10:53PMबेळगाव : भाऊराव कणबरकर

बेळगाव जिल्ह्यातील 641 प्राथमिक शाळांवर विलीनीकरणाची टांगती तलवार आहे. या शाळांची पटसंख्या 30 च्या आत असून, त्यामुळे या शाळा जवळच्या शाळांमध्ये विलीन होऊ शकतात. त्यात बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 292 तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 349 शाळांचा समावेश आहे. 

पटसंख्या 30 च्या आत असेल तर अशा शाळा 1 कि.मी. अंतरावरच्या दुसर्‍या सरकारी शाळेत विलीन केल्या जाणार आहेत. तसा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिक्षण खात्याने प्रत्येक जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांकडून आकडेवारी मागवली असून, बेळगाव आणि चिक्‍कोडी जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांनी तशी माहिती बंगळूरला पाठवली आहे. 

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 560 कनिष्ठ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी 8 शाळामध्ये एकही विद्यार्थी नाही. 1 ते 10 पटसंख्या असलेल्या शाळा 67 आहेत. तर  11 ते 30 पटसंख्या असलेल्या 217 शाळा आहेत. 

अशा एकूण एकूण 292 शाळांची पटसंख्या 30 च्या आत आहे. चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 745 कनिष्ठ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी एका शाळेत एकही विद्यार्थी नाही. 1 ते 10 पटसंख्या असलेल्या 46 शाळा आहेत, तर 11 ते 30 पटसंख्या असलेल्या 302 शाळा आहेत. राज्यात 34 जिल्ह्यांत एकूण 21,486 कनिष्ट प्राथमिक शाळा आहेत.

त्यात शून्य पटसंख्या असलेल्या 261, 1 ते 10 पटसंख्या असलेल्या 3,374 आणि 11 ते 30 पटसंख्या असलेल्या 11 हजार 77 शाळा आहेत. विरोध  शाळा विलीनीकरणास शिक्षकांचा विरोध आहे. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एन. महेश यांनी अहवाल मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याकडे दिला आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असून अर्थसंकल्प सादर करताना शाळा विलिनीकरण करणार असे सांगितले होते.