Thu, Aug 22, 2019 08:51होमपेज › Belgaon › बेळगाव जिल्ह्यात 3 बालकांसह 6 जणांचा मृत्यू

बेळगाव जिल्ह्यात 3 बालकांसह 6 जणांचा मृत्यू

Published On: Apr 25 2018 12:56AM | Last Updated: Apr 25 2018 12:55AMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन बालकांसह सात जणांचा मृत्यू झाला. त्यात एका महिला कैद्याचाही समावेश आहे.

घरासमोर बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत हरीश बसवराज भेंडिगेरी (वय 3) या तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शिंदोळीत सकाळी घडली. घरासमोर खेळत असताना अचानकपणे बालक टाकीत पडल्याचे कोणाच्याच लक्षात आले नाही. बालक दिसत नसल्याचे पाहून शोधाशोध करण्यात आली असता तो पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत आढळला. 

धामणे येथील विनायक राजू मूळकर (वय 8) या बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. विनायकला इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. भाजून जखमी झालेल्या प्रवीण व्यंकप्पा नाईकर (वय 12 रा. सत्तीगेरी ता. सौंदत्ती) या मुलाचा  जिल्हा इस्पितळात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 

विषप्राशन केल्याने अत्यवस्थ झालेल्या दोघांंचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुंडाप्पा बसाप्पा येळ्ळूर (वय 22, रा. श्रीनगर) असे एकट्याचे नाव आहे. त्याला जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. शिवाप्पा फकिरप्पा कौजलगी (वय 35, रा. करीकट्टी, ता. सौंदत्ती) असे दुसर्‍या मृताचे नाव आहे.