Wed, Mar 27, 2019 04:02होमपेज › Belgaon › ३५ लाखांच्या खंडणीसाठी ५ वर्षांच्या बालकाचे अपहरण

३५ लाखांच्या खंडणीसाठी ५ वर्षांच्या बालकाचे अपहरण

Published On: Jan 30 2018 11:14PM | Last Updated: Jan 30 2018 11:00PMबंगळूर : प्रतिनिधी      

घरासमोर खेळत असलेल्या 5 वर्षीय बालकाचे अपहरण करून 35 लाखांची खंडणी मागणार्‍या 5 जणांच्या टोळीपैकी चौघांना अटक करण्यात महानगर पोलिसांना यश आले आहे.

अभिषेक (वय 23, रा. मंजुनाथनगर), श्रीकांत (19, रा. विठ्ठलनगर), हर्षित (18, रा. कस्तुरबानगर), दिव्यतेज ऊर्फ डीजे (22, रा. कस्तुरीनगर, ब्याटरायनपूर) अशी खंडणीखोरांची नावे आहेत. 

खंडणीखोरांचा पाठलाग करताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात  टोळीपैकी  दिव्यतेज याच्या पायाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर व्हिक्टोरिया इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. त्यांचा एक साथीदार फरार आहे.

मंजुनाथनगरातील आपल्या घरासमोरील अंगणात गेल्या रविवारी रात्री खेळत असलेल्या चंदन नामक 5 वर्षीय बालकाचे कारमधून अपहरण करण्यात आले होते. बालकाच्या  सुखरुरूप सुटकेसाठी अपहणकर्त्यांनी  पालकांकडे 35 लाखांची मागणी केली होती. पालकांनी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तपासकार्य चालविले.