Sun, Aug 25, 2019 03:40होमपेज › Belgaon › राज्यात पावसाचे 5 बळी

राज्यात पावसाचे 5 बळी

Published On: Jun 04 2018 1:03AM | Last Updated: Jun 03 2018 11:13PMबंगळूर : प्रतिनिधी

राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसात गेल्या 24 तासांत 5 जणांचा बळी गेला आहे. काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असून घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. 

धारवाड जिल्ह्यामधील माजी आमदार एन. एच. होनरेड्डी यांचे भाऊ वाय एच. होनरेड्डी (वय 48) यांचा वीज पडून चिलकवाड येथे मृत्यू झाला. बंगळूर ग्रामीण जिल्ह्यातील नारायणपूर येथे गौरम्मा (वय 56) यांचा  मृत्यू झाला. बंगळूर शहरामध्ये शनिवारी संरक्षक भिंत कोसळून मालतेश हा कामगार ठार तर इतर तीघे जखमी झाले आहेत. 

राज्यातील किनारपट्टी दक्षिणेतील ग्रामीण भाग आणि मुंबई-कर्नाटक भागात मुसळधार वृष्टी झाली. विजांचा कडकडाट आणि वादळ यामुळे अनेक जिल्ह्यात पडझडीच्या घटना घडल्या आहेत. लहान नद्यांना आताच पूर आला आहे. 
चिक्कबळ्ळापूरमध्ये युवक अंजुम याचाही पावसामुळे बळी गेला आहे. रामनगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक घरे कोसळली असून प्रशासनाने मदतकार्य युद्धपातळीवर सुरू केले आहे.