Tue, Apr 23, 2019 19:56होमपेज › Belgaon › जिल्ह्यात ४,४०८ मतदान केंद्रे

जिल्ह्यात ४,४०८ मतदान केंद्रे

Published On: Mar 05 2018 1:41AM | Last Updated: Mar 04 2018 11:36PMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 505 ग्राम पंचायती, 10 ता. पं., 33 नगर पंचायत कार्यक्षेत्रात तब्बल 4 हजार 408 मतदान केंद्रे आहेत. यंदा नव्या 46 हजार मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे मतदान केेंद्रांची संख्याही वाढवावी लागली आहे, अशी माहिती जि. पं. सीईओ आर. रामचंद्रन यांनी दिली.

जिल्हा स्वीप समितीची बैठक शनिवारी जि. पं. सभागृहात झाली.त्यावेळी रामचंद्रन यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक नागरिकांने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. यातून चांगले व जबाबदार लोकप्रतिनिधी निवडून येतात. यासाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रत्येक अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत.

जिल्ह्यात 4,408 मतदान केंद्रे असून ग्रामीण भागात मतदारांची संख्या वाढली आहे. यामुळे मतदान केंद्राची संख्या वाढली आहे. अधिकार्‍यांनी मतदानाच्या कामाकडे गंभीरपणे आवश्यक आहे. याकडे कोणत्याही अधिकार्‍यांनी दुर्लक्ष करू नये. असा प्रकार केल्यास अशा बेजबाबदार अधिकार्‍यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.अधिकार्‍यांनी सध्या प्रत्येक मतदानकेंद्रनिहाय जागृती मोहीम राबविणे अत्यावश्यक आहे. मनपा आयुक्त शशीधर कुरेर म्हणाले, ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातील नागरिकही मतदानाकडे दुर्लक्ष करतात. यामुळे मतदानाची टक्केवारी घटत आहे. ती वाढली पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

जिल्हा नगर प्राधिकारणाचे लेखाधिकारी प्रविण बागेवाडी, जि. पं. मुख्य लेखाधिकारी शंकरानंद बनशंकरी यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.