Sat, Feb 16, 2019 23:29होमपेज › Belgaon › मद्यपींनी रिचवली ४३७३ बॉक्स दारू

मद्यपींनी रिचवली ४३७३ बॉक्स दारू

Published On: Jan 03 2018 1:10AM | Last Updated: Jan 03 2018 12:45AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

नववर्ष स्वागतासाठी बेळगाव जिल्ह्यातील मद्यपींनी तब्बल 4373 बॉक्स दारू रिचवली आहे. यामध्ये शहरात 1198 बॉक्सची विक्री झाली. ही विक्री गतवर्षीच्या तुलनेत कमी असून शहराव्यतिरिक्‍त जिल्ह्यातील अन्य भागात 3175 बॉक्सची विक्री झाल्याची माहिती अबकारी खात्याने दिली आहे.

यावर्षी ऐन सुट्टीदिवशी रविवारी जुन्या वर्षाला निरोप देण्यात आला. 31 डिसेंबरला रविवार असल्यामुळे शनिवारी सायंकाळपासून नागरिकांच्या उत्साहाला उधाण आले होते. परिणामी, शनिवारपासूनच दारूविक्रीत वाढ झाली होती. परिणामी, शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत 4373 बॉक्सची दारूविक्री झाली.मागील वर्षी 2017 मध्ये जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी शहरात 1849 बॉक्स दारूची विक्री झाली होती. तर शहरात 5493 इतकी दारूविक्री झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी दारूविक्रीत घट झाली आहे.