Mon, May 27, 2019 07:27होमपेज › Belgaon › डेंग्यू, चिकुन गुनियाचे 424 रुग्ण

डेंग्यू, चिकुन गुनियाचे 424 रुग्ण

Published On: Jul 29 2018 1:20AM | Last Updated: Jul 29 2018 12:27AMबेळगाव : प्रतिनिधी

पावसामुळे बहुसंख्य ठिकाणी कचरा आणि पाण्याचा निचरा होण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शहर व उपनगरांमध्ये आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून एकूण 424 रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य अधिकार्‍यांनी दिली. 

महानगरपालिका सभागृहात शनिवारी प्रशासकीय बैठक पार पडली. बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना आरोग्याधिकार्‍यांनी ही माहिती दिली. 

शहरातील आरोग्य केंद्रात चिकुन गुनियाच्या 28 आणि डेग्यूंच्या 8 रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरकारी रुग्णालयात 187 व केएलईमध्ये 201 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जागृती अभियान राबवत असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.  शहरातील बहुसंख्य ठिकाणी डास निर्मूलनासाठी फॉगिंग करण्यात येत आहे. वडगाव परिसरात डेंग्यू व चिकुन गुनियासंदर्भात जनजागृती करण्यात येत असल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले. 

हेस्कॉकडून भूमिगत वाजवाहिन्या घालण्यात येत आहेत. हे काम करत असताना अनसुरकर गल्ली, मारुती गल्लीत ट्रान्सफॉर्मर रस्त्यावरच आहेत. वीजखांब बदलताना वीज काढली जाते. मात्र, त्यानंतर वीज जोडणी लवकर करण्यात येत नाही. त्याकडे हेस्कॉमच्या अधिकार्‍यांनी लक्ष द्यावेे. नगरसेवक विजय भोसले, किरण सायनाक, सुधा भातकांडे यांनी समस्या मांडल्या. 
याबाबत माहिती देताना हेस्कॉम अधिकार्‍यांनी, शहराअंतर्गत 140 किमी खोदाई करण्यात आली आहे. पूर्ण रस्ता पॅचवर्क करून देण्यात आला आहे, असे सांगितले.