Sun, Jul 21, 2019 06:17होमपेज › Belgaon › बेळगावात पासपोर्टसाठी ४२०० अर्ज

बेळगावात पासपोर्टसाठी ४२०० अर्ज

Published On: May 31 2018 1:35AM | Last Updated: May 30 2018 8:30PMबेळगाव : प्रतिनिधी

पासपोर्ट मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तरतूद आहे. मंगळूर, हुबळी, धारवाड, गुलबर्गानंतर बेळगाव शहरात पासपोर्ट देण्याची सोय पोस्ट कार्यालयात करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2017 पासून आजतागायत 4,200 जणांनी पासपोर्टसाठी अर्ज केले आहेत. रविवार सुट्टी खेरीज दररोज 75 जणांना  बोलावून अर्जासोबत दिलेल्या प्रमाणपत्राच्या सत्यप्रती पडताळून पाहण्यात येत आहेत.

बेळगाव शहरात चिकोडी, गोकाक, निपाणी व खानापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. 45 वषार्ंवरील 60 जणांनी पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. नोकरी, व्यवसाय व हजयात्रेसाठी जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. म्हैसूर, दावणगिरी, शिमोगा, विजापूर, गदग भागातून पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्जाची संख्या कमी आहे.

अर्ज करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया असल्याने अर्ज करतानाच पडताळणीची तारीख व वेळ दिली जाते. यापूर्वी  कार्यालयात दररोज 50 अर्जाची पडताळणी होत होती. आता दररोज 75 अर्जाची होत आहे. त्यासाठी तीन कर्मचारी कार्यरत आहेत. अर्ज पडताळणी करताना अर्जदार प्रत्यक्ष हजर राहणे आवश्यक आहे. त्याने केलेल्या अर्जाप्रमाणे  कार्यालयातील ए वन विभागात  सत्यप्रत पडताळून पाहण्यात येते. यानंतर ए 2 विभागात अर्जदाराचे फोटो काढण्यात येतात. नंतर अर्ज ऑनलाईन अपलोड करण्यात येतो.

प्रमाणपत्र कोणते चालते?

36 व 60 पानी पासपोर्ट उपलब्ध आहेत. 1500 ते 2000 रुपये फी पासपोर्टसाठी आकारण्यात येते. अर्जदाराचा राहण्याचा पत्ता पडताळण्यासाठी आधारकार्ड, मतदान ओळखपत्र,, फोन बिल, गॅस कनेक्शन, बँक खाते, भाडेकरारपत्र यापैकी एक प्रमाणपत्र पुरेसे आहे.