Thu, May 23, 2019 15:30
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › चिकोडी-सदलगा मतदारसंघासाठी ४२ कोटी

चिकोडी-सदलगा मतदारसंघासाठी ४२ कोटी

Published On: Jan 11 2018 1:05AM | Last Updated: Jan 10 2018 11:49PM

बुकमार्क करा
चिकोडी : प्रतिनिधी

चिकोडी-सदलगा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी 42 कोटी 66 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार प्रकाश हुक्केरींनी दिली. तालुक्यातील एकसंबा येथे मतदारसंघातील जि.पं., ता.पं. व ग्रा.पं.सदस्य व एकसंबा, चिकोडी, सदलगा नगरंपचायत नगरसेवकांच्या व हेस्कॉम अधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. 

चिकोडी सदलग्यात  शेतपट्ट्यामंध्ये सिंगल फेज विजेसाठी 10.52 कोटी :  राज्यात पहिल्यांदाच आंध्रप्रदेशच्या धर्तीवर चिकोडी मतदारसंघात शेतपट्ट्यांमध्ये राहणार्‍या 4015 घरांना निरंतर सिंगल फेज वीज पुरवठा योजनेसाठी 10.52 कोटी, पीडब्ल्यूडकडून राज्य मार्गावर रस्ता व दुभाजक निर्मितीसाठी 5 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. 

ग्रामीण रस्त्यांसाठी 10 कोटी 14 लाख :  वडगोल ते सदलगा एकसंबा रस्त्यापर्यंत 1 कोटी, वडगोल नणदी निपाणी रस्त्यापर्यंत 60 लाख, वडगोल रस्ता तेे भिवशी भागाई तोटमार्गे नणदी सदलगा रस्त्यासाठी 75 लाख,  शिरगांववाडीतील  रस्त्यासाठी 46 लाख, हंड्यानवाडी गांवातील रस्त्यासाठी 52 लाख, संकणवाडी गांवातील रस्त्यासाठी 69 लाख, इंगळी गांवठाण केरेमुली रस्त्यापासून शंकर अंबी मळ्यापर्यंतच्या रस्त्यासाठी 52 लाख, इंगळी शिरगुप्पी मुख्य रस्त्यापसून गांवठाण केरीमुलीला संपर्क रस्ता 60 लाख, नणदी कट्टीकर ते पाटील वसाहतीपर्यंत 1 कोटी, जोडकुरळीत सवदत्ती ते दुगाणी वसाहतीपर्यंत 1 कोटी, मांजरी पाटील ते जुन्या येडूर रस्त्यापर्यंत 1 कोटी, चंदूर ते  चंदूरटेक 1 कोटी, येडूर टेक नरवडे ते वंटगुडे कॉलनीपर्यंत 1  कोटी.

शाळांसाठी 1.45 कोटी : शिक्षण खात्याकडून प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या 20 खोल्यांसाठी प्रत्येकी 7.25 लाख प्रमाणे एकूण 1.45 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातून अंकली, हळकेरी, हिरेकोडी गार्डन चिकोडी, मांजरी, गिरगांव, एकसंबा, सिध्दापूरवाडी, काडापूर,  मांजरीवाडी, चिंचणीत खोल्या उभारल्या जातील.

शेतीरस्त्यासाठी 15 कोटी 50 लाख : एकसंबा येथे 1 कोटी 50 लाख, अंकली ते नणदी कॉलनीपर्यंत 50 लाख, हिरेकुडीतील रस्त्यांसाठी 90 लाख, एकसंबा- दानवाड रस्ता तेे लक्ष्मी नगर वसाहतीपर्यंत 1 कोटी, अंकली कागवाड रस्ता ते स्वामी मळ्यापर्यंत 1 कोटी 40 लाख, जनवाड येथील शेतमळा रस्त्यासाठी 1 कोटी 10 लाख, सदलगा आंबेडकर नगर ते दूधगंगा नदीपर्यंत 90 लाख, वठार मड्डी ते नदीपर्यंत 70 लाख, नेज 1 कोटी, बसवनाळगड्डे 80 लाख, हिरेकुडी 150 लाख, एकसंबा 80 लाख, बाळोबा क्रॉस ते वाल्मिकी नगर रस्त्यासाठी 1 कोटी,हिरकुडी कोळी मळ्यापर्यंत 40 लाख, काडापूर रस्त्यांसाठी 80 लाख, काडापूर बापू पवार मळ्यापर्यंत 60 लाख. 

यावेळी अनिल पाटील, सुरेश कोरे, द्राक्ष रस मंडळाचे रवी मीर्जे, जि.पं.सुदर्शन खोत, नरेंद्र नेर्लीकर, रामा माने, मुद्दसर जमादार, शेखर मुंडे, विनोद कागे, सतीश पाटील, आणासाहेब पवार, अजय सुर्यवंशी, हेस्कॉमचे श्रीकांत ससालट्टीआदि उपस्थित होते.