Tue, Mar 19, 2019 20:26होमपेज › Belgaon › ‘शेतकरी संवाद’ मध्ये अथणीतून 4 जणांचा सहभाग 

‘शेतकरी संवाद’ मध्ये अथणीतून 4 जणांचा सहभाग 

Published On: Jul 08 2018 1:43AM | Last Updated: Jul 07 2018 11:53PMअथणी : वार्ताहर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील शेतकरी संवाद कार्यक्रमात  ऊस उत्पादक शेतकर्‍यांना  उपयुक्त मार्गदर्शन केल्याची माहिती येथील प्रगतशील शेतकरी अमर दुर्गण्णर यांनी दिली. देशातील 5 राज्यांमधील सुमारे 140 प्रगतशील शेतकर्‍यांच्या नवी दिल्ली येथील बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी ऊस उत्पादक शेकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या. 

या बैठकीला अथणी येथून संजय नाडगौडर, अमर दुर्गन्नवर,  परगौडा पाटील, अशोक अम्मणगी उपस्थित होते. राज्य भाजप रयत मोर्चा अध्यक्ष माजी आ. लक्ष्मण सवदी यांनी या चार शेतकर्‍यांच्या नावाची शिफारस या कार्यक्रमासाठी केली होती.