Tue, Sep 25, 2018 12:52होमपेज › Belgaon › आयकरने जप्त केले 4 कोटी अन् दागिने

आयकरने जप्त केले 4 कोटी अन् दागिने

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:32AMबंगळूर : प्रतिनिधी

4 कोटी अन् दागिनेकर्नाटक व गोवा सर्कलच्या आयकर खात्याच्या तपास विभागाने कर्नाटकामध्ये मतदारांना वाटण्यात येणारी 4 कोटी 13 लाखांची रक्‍कम व साडेचार किलो सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या नोटामध्ये 2 हजार व 500 रुपयांचा समावेश आहे. आयकर विभागाच्या तपास पथकाने राज्याच्या विविध ठिकाणी छापे टाकून  ही रक्‍कम जप्त केली. 12 मे रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी ही रक्‍कम मतदारांना वाटण्यात येणार होती. बंगळूरमध्येही 2.47 कोटी रुपयांची रक्‍कम व बळ्ळारीमध्ये 55 लाख रुपयांची रक्‍कम जप्त केली आहे. म्हैसूर येथील वेअर हाऊसमध्येही 9.51 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. ती रक्‍कम मतदारांना वाटण्यात येणार होती.  

Tags : Belgaum, 4, crore, jewelry, seized, income tax