Wed, Mar 27, 2019 06:11होमपेज › Belgaon › पंतप्रधानांच्या विदेश दौर्‍यावर ३७७ कोटी

पंतप्रधानांच्या विदेश दौर्‍यावर ३७७ कोटी

Published On: Jun 10 2018 1:47AM | Last Updated: Jun 09 2018 11:56PMबेळगाव : प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी जून 2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर जानेवारी 2018 पर्यंत म्हणजे 43 महिन्यांमध्ये त्यांच्या परदेश दौर्‍यांवर 377 कोटी 67 लाख 17 हजार 465 रुपयांचा खर्च झाला आहे. कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी माहिती हक्क अधिकाराद्वारे ही माहिती  मिळवली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 43 महिन्यांमध्ये 165 दिवसांचा कालावधी परदेशात घालवला आहे.

या अवधित त्यांनी 52 देशांना भेटी दिल्या. फ्रांन्स, जर्मनी, कॅनडा या देशांचा त्यांनी 9 दिवसांचा दौरा करून 32 कोटी 25 लाख 78 हजार रुपयांचा खर्च केला आहे. तर भूतान देशाच्या 2 दिवसाच्या दौर्‍यावर त्यांनी 2 कोटी 45 लाख 27 हजार 465 रुपयांचा खर्च केला आहे. त्या खर्चामुळे देशाला कोणता लाभ झाला, ही माहिती सरकारने जनतेला दिली पाहिजे, अशी मागणीही  गडाद यांनी केली.