Tue, Apr 23, 2019 01:38होमपेज › Belgaon › ‘हालशुगर’साठी 13 करिता 32!

‘हालशुगर’साठी 13 करिता 32!

Published On: Sep 10 2018 1:15AM | Last Updated: Sep 09 2018 10:07PMनिपाणी : प्रतिनिधी

हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 15  रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी रविवारी अर्ज माघारीनंतर 13 जागांसाठी 32 उमेदवार रिंगणात आहेत. एसटी गटातून कल्लाप्पा भीमा नाईक (हुन्‍नरगी), ओबीसी गटातून म्हाळाप्पा सिद्राम पिसोत्रे (गळतगा) व राजाराम मल्हारी खोत (आप्पाचीवाडी) उमेदवार बिनविरोध निवडून आले. माजी आ. प्रा. सुभाष जोशींसह काँग्रेसच्या अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने जोल्लेप्रणित विकास पॅनेल मजबूत झाले आहे.

बिनविरोध निवडणूक होण्याची चिन्हे दिसत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अट्टहासामुळे निवडणूक लागली. अ-वर्ग जनरल गटातील 9 जागांसाठी 21 उमेदवार रिंगणात आहेत. महिला गटातून 2 जागांसाठी 4 तर एससी गटातील एका जागासाठी 5 उमेदवार, ब-गटातील एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत.

निवडणुकीसाठी रविवारी अर्ज माघारीदिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत अ-वर्ग जनरल गटातील 34 उमेदवार, महिला गटातून 11, एससी गटातून 2, एसटी गटातून एक, ओबीसी गटातून 8 व ब-गटातून 7 जणांनी माघार घेतल्याने  रिंगणात 13 जागांसाठी 32 जण रिंगणात आहेत. अर्ज माघारीमध्ये जनरल गटातून माजी संचालक मल्लिकार्जुन पाटील, आनंदा गिंडे, अशोक पाटील, बाबुराव मगदूम, प्रवीण भाटले, राजू पाटील व संजय शिंत्रे यांचा समावेश  आहे.

महिला गटातून माजी उपाध्यक्षा अनिता रामगोंडा पाटील-अकोळ व माजी संचालिका विद्या आनंद गिंडे-गळतगा यांच्यासह 11 महिलांनी माघार घेतली. गतवेळी अनिता पाटील व गिंडे बिनविरोध निवडून आल्या होत्या. ओबीसी गटातून अरुण निकाडे, सत्याप्पा ढवणे यांच्यासह 8 जणांनी माघार घेतली.

ब-वर्गातून माजी आ. प्रा. सुभाष श्रीधर जोशी यांनी अर्ज मागे घेतला. त्यांनी आपले पुत्र सुजीत जोशी यांचा अर्ज रिंगणात ठेवला आहे. प्रा. सुभाष  जोशी सलग सहावेळा कारखान्याचे संचालक होते. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दुपारी उशिरापर्यंत सहकारनेते अण्णासाहेब जोल्ले, आ. शशिकला जोल्ले यांच्यासह मान्यवरांचे प्रयत्न सुरु होते. पण स्वाभिमानीच्या उमेदवारांनी वेळेत अर्ज माघार व चर्चेसाठी न आल्याने  निवडणूक अधिकारी एस. एस. बिरादार व एम. बी. पुजारी यांना निवडणूक जाहीर करावी लागली.

रिंगणातील विकासपॅनेलचे उमेदवार

अ-वर्गातील जनरल गटातून विकास पॅनेलचे उमेदवार म्हणून आप्पासाहेब शिवराम जोल्ले- एकसंबा,  अविनाश अण्णासाहेब पाटील-नांगनूर, कमते विश्‍वनाथ सदाशिव-खडकलाट, चंद्रकांत कोठीवाले-निपाणी, मलगोंडा पिरगोंडा पाटील-जत्राट, रामगोंडा बाळगोंडा पाटील-जनवाड, पप्पू ऊर्फ रामगोंडा यलगोंडा पाटील-रामपूर, समित बाबासाहेब सासणे-पडलिहाळ व सुकुमार पाटील बुदिहाळकर यांचा समावेश आहे.

विकास पॅनलविरोधात अनिल संकपाळ, आनंद परगौडनावर, दत्तात्रय खोत, बाबासो कोकाटे, मधुकर पाटील-पडलिहाळ, मधुकर पाटील-कुर्ली, मलगोंडा तावदारे, राजगोंडा जयाप्पागोळ, रामगौडा पाटील, रामू मुधाळे, श्रीकांत संकपाळ, सुनील शिंदे रिंगणात आहेत.

महिला गटातून विकास पॅनेलच्या उज्ज्वला प्रकाश शिंदे, मनीषा वैभव रांगोळे यांच्या विरोधात कांचन शांतीनाथ खोत व साधना अनिल संकपाळ, एससी गटातून विकास पॅनेलच्या प्रताप मेत्राणी यांच्या विरोधात गजेंद्र पोळ, प्रभाकर भीमण्णावर, शरद कांबळे व श्रीमंत मेस्त्री यांची उमेदवारी आहे. ब-गटातून सुजीत सुभाष जोशी यांच्या विरोधात स्वाभिमानीनेचे नरेश सवदी रिंगणात आहेत. निवडणूक जोल्लेप्रणित विकास पॅनेल विरुद्ध स्वाभिमानी संघटना अशी रंगणार आहे.