Mon, Mar 25, 2019 05:17
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › कारवारमध्ये 316 कॅन्सर रूग्ण

कारवारमध्ये 316 कॅन्सर रूग्ण

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 8:10PMकारवार : प्रतिनिधी

तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षांत एकूण 316 कॅन्सर रूग्ण आढळल्याची माहिती मुंबईतील टाटा मेमोरियल इस्तिपळाच्या सर्वेक्षण अहवालात दिसून आले आहे. यापैकी 187 महिला आणि 129 पुरूष आहेत.
इतर शहरांच्या तुलनेत कारवारमध्ये कॅन्सरचे प्रमाण कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सर्वेक्षण करण्यात आलेल्या 17 शहरांपैकी कारवार शहर सोळाव्या स्थानावर आहे. राज्य आरोग्य खात्याच्या आवाहनानुसार हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 2010 ते 2013 या काळातील कॅन्सर रूग्णांचे सर्वेक्षण करून अंतरिम अहवाल सादर करण्यात आला आहे.  टाटा मेमोरियल इस्पितळाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी स्थानिक वैद्यकीय व्यवस्थेच्या सहाय्याने विविध गावांमध्ये सर्वेक्षण केले. या पथकाचे प्रमुख बी. गणेश यांनी गेल्या मार्च महिन्यात 26 पानी अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

25 ते 54 वयोमानातील महिला आणि 60 ते 64 वयोमानातील पुरूषांमध्ये कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. पुरूषांमध्ये तोंड, जीभ, फुफ्फुस, अन्ननलिकेचा कॅन्सर आढळला आहे. महिलांमध्ये स्तन, गर्भाशय आणि गर्भाशयाशी संबंधित कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. चौदा वर्षाखालील सहा मुलांमध्ये कॅन्सर आढळला आहे. दरम्यान, इतर शहरांच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये कॅन्सरचे प्रमाण कमी असून त्याबाबत काळजी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. एस. नकुल यांनी केले आहे. जिल्ह्यातील कॅन्सरपीडितांची योग्य माहिती आतापर्यंत उपलब्ध नव्हती. टाटा मेमोरियलच्या तज्ज्ञांनी सर्वेक्षण करून अहवाल सादर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कॅन्सर रूग्णांच्या वाढती संख्या नियंत्रणात असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.