Wed, Jul 17, 2019 12:16होमपेज › Belgaon › पाणीपट्टीत 300 रु. वाढ?

पाणीपट्टीत 300 रु. वाढ?

Published On: Dec 19 2017 1:56AM | Last Updated: Dec 19 2017 1:19AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

वर्षभरात बेळगावच्या नागरिकांना 100 दिवसही पाणी मिळत नाही. मात्र, नागरिकांकडून प्रत्येक महिन्याला न चुकता पाणीपट्टी वसूल केली जाते. आता पुन्हा एकदा बेळगावकरांना वाढीव पाणीपट्टीला सामोरे जावे लागणार आहे. वाढीव पाणीपट्टीसाठी पाणीपुरवठा महामंडळाने मनपाकडे तगादा लावला आहे. नजीकच्या काळात वर्षाला 300 रु. पाणीपट्टी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. 

बेळगाव शहरातील 10 प्रभागात 24 तास पाणी योजनेंतर्गत मीटरद्वारे पाणीपट्टी आकारली जात आहे. 24 तास पाणी योजनेचा लाभ घेणार्‍या 10 प्रभागांतील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळते. याउलट शहरातील 48 प्रभागातील नागरिकांना वर्षातील 365 दिवसांपैकी 100 दिवसही पाणी मिळणे अवघड असते. 2011 साली पाणीपट्टी वाढविण्यात आली होती. त्यानंतर नव्याने पाणीपट्टी वाढ करण्यासाठी महामंडळ मनपाच्या मागे लागले आहे. सहायक कार्यकारी अभियंत्यांनी सोमवारी महापौर संज्योत बांदेकर यांची भेट घेऊन वाढीव यासंदर्भात चर्चा केली.