Mon, Jul 22, 2019 00:35होमपेज › Belgaon › ‘गणेश विसर्जन’वर 300 कॅमेर्‍यांची नजर

‘गणेश विसर्जन’वर 300 कॅमेर्‍यांची नजर

Published On: Aug 31 2018 1:38AM | Last Updated: Aug 30 2018 10:38PMबेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटकात बेळगावचा गणेशोत्सव अव्वल आहे. असा गणेशोत्सव मी पाहिलेला नाही. सर्वात शेवटी गणपती कोणत्या मंडळाचा विसर्जन होणार हा मुद्दा वगळता कोणताही अनुचित प्रकार घडत नाही. यंदा 24 नव्हे 48 तास विसर्जन मिरवणूक काढा, पण कायदेभंग नको. या काळात 300 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्‍त सीमा लाटकर यांनी दिली. महापालिकेत गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसबंधी सर्व खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक गुरुवारी झाली. तीत लाटकर बोलत होत्या. 

विसर्जन मिरवणूक संपण्यासाठी  अनंत चतुर्दशी उलटून दुसर्‍या दिवशीचे 12 ते 1 वाजतात. मिरवणुकीत युवक मद्यपान करून सहभागी होतात. त्याचा महिला वर्गाला त्रास होतो. त्यासाठी पोलिसानी विशेष लक्ष घालावे. सर्वात शेवटी आपल्याच मंडळाचा गणपती विसर्जन होणार अशी भूमिका मंडळाचे कार्यकर्ते घेतात. त्यामुळे विसर्जन मिरवणूक थांबते. या समस्यांवर तोडग्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. 

तसेच अलीकडे सार्वजनिक गणेशोत्सवाचा मंडळाचा अध्यक्ष होणे युवक टाळत आहेत. कारण, कोणताही अनुचित प्रकार घडल्यानंतर पोलिसांकडून पहिला त्रास अध्यक्षाला दिला जातो. त्यामुळे अध्यक्षपद नको रे बाबा, अशी म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे, असा सूर बैठकीत उमटला.

यावर लाटकर म्हणाल्या, कायद्याच्या चौकटीत राहून आपण गणेशोत्सव साजरा करू या. त्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 300 सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर असणार आहे. मिरवणूक शांततेत काढा. कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.