Wed, Jul 17, 2019 18:45होमपेज › Belgaon › ३ लाखांचे सागवान जप्‍त

३ लाखांचे सागवान जप्‍त

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 07 2018 11:33PM

बुकमार्क करा
हल्याळ : वार्ताहर    

हल्याळ पोलिसांनी नजीकच्या गरडोळ्ळी येथे शुक्रवारी छापा घालून  सागवान लाकडाचे 5 ओंडके जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या सागवानाची किंमत सुमारे 3 लाख रु.आहे.

गरडोळ्ळी गावाजवळ गावठी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती हल्याळ पोलिसांना मिळाल्यानंतर मंडल पोलिस निरीक्षक सुंदरेश होळेन्नवर व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, गावठी दारू तयार करताना कोणीही आढळून न येता तेेथे सागवानाचे ओंडके दिसून आले. ओंडके झुडुपामध्ये लपवून ठेवण्यात आले होते. 

पोलिसांनी सागवान  वनखात्याकडे सुपूर्द केले. हल्याळ वन विभाग व पोलिसांनी पुढील तपास चालविला आहे.