Mon, Nov 19, 2018 08:39होमपेज › Belgaon › अथणी तालुक्यात ३.३४ लाखांचा गांजा जप्त: एकावर गुन्हा दाखल

अथणी तालुक्यात ३.३४ लाखांचा गांजा जप्त: एकावर गुन्हा दाखल

Published On: Jun 10 2018 1:47AM | Last Updated: Jun 10 2018 12:00AMनिपाणी : प्रतिनिधी

अथणी तालुक्यातील बळवाड येथे शनिवारी 3.34 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला असून एकावर   गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौलासाब इमामसाब पिंजार रा.बळवाण असे त्याचे नाव आहे. बळवाड येथील पिंजार यांच्या उसाच्या मळ्यात  गांजा पिकविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्यानंतर मंडल पोलिस निरीक्षक शंकरगौडा पाटील यांच्या नेतृत्वात हवालदार एस.सी.अंबरशेट्टी, एल.एन.कुंभारे, अशोक बजंत्री, संदीप कोरे व शिवशंकर बेवनूर हे बळवाड येथे मौलासाब पिंजार याच्या मळ्यावर दाखल झाले.

त्यावेळी मौलासाब घरामध्ये होता. पोलिस पथकाने घरावर छापा घातला. मौलासाब याने घरामध्ये एका पोत्यात गांजा लपवून ठेवला होता. पोलिसांनी पोत्यातील 26 किलो गांजा जप्त केला असून त्याची किंमत 2 लाख, 86 हजार, 800 रु. आहे. अधिक चौकशी अंती मौलासाब याने उसाच्या मळ्यात  गांजा पिकवित असल्याची कबुली दिली. पोलिसांच्या पथकाने मळ्यावरही छापा घालून गांजाची 7 झाडे जप्त केली. याचे वजन 15 किलो असून किंमत 47 हजार 700 रु.आहे. डीसीबीने हे मौलासाब याच्यावर गुन्हा दाखल करून प्रकरण अथणी पोलिसांकडे वर्ग केले आहे. जिल्हा पोलिस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी यानी डीसीबी पथकाचे अभिनंदन केले आहे.