होमपेज › Belgaon › तब्बल २७ उमेदवारी अर्ज अवैध

तब्बल २७ उमेदवारी अर्ज अवैध

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 26 2018 12:57AMबेळगाव : प्रतिनिधी

तब्बल 27 अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत. त्यापैकी बेळगाव दक्षिण, ग्रामीण आणि खानापूर या तिन्ही मतदारसंघांत प्रत्येकी 3 अर्ज अवैध ठरले, तर बेळगाव उत्तरमध्ये 1 अर्ज अवैध ठरला. महत्त्वाचे म्हणजे निपाणी, अथणी, कागवाड, गोकाक, बैलहोंगल आणि सौंदत्ती या मतदारसंघांतील सारे अर्ज वैध ठरले आहेत. जिल्ह्यातील 18 मतदारसंघांसाठी 279 अर्ज भरण्यात आले होते. बुधवारी छाननी होऊन त्यापैकी 27 अर्ज अवैध ठरले. सगळ्या महत्त्वाच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस अर्ज माघार घेण्यासाठी राखीव असून शुक्रवारी दुपारी 3 नंतर रिंगणातील अंतिम उमेदवाराचे चित्र स्पष्ट होईल.    

वैध उमेदवारांची यादी

निपाणी ः  काकासाहेब पाटील (काँग्रेस), शशिकला जोल्ले (भाजप), रमेश कामत (बसप), रोहिणी दिक्षीत (एमईपी), विजयालक्ष्मी कुरणे, सचिन मधाळे, संभाजी थोरवत, अनिल कमते, जयवंत मिरजकर, शरद पाटील. 

चिकोडी ः  गणेश हुक्केरी (काँग्रेस), आण्णासाहेब जोल्ले (भाजप), सदाशिवप्पा वाळके (बसप), अन्नपूर्णा असूरकर (एमईपी), आप्पासाहेब कुरणे (भारिप), जितेंद्र नेर्ले, तुकाराम कोळी, दादा पाटील, मोहन मोटण्णावर, सुनील खोत, सोमनाथ हिरेमठ. 

अथणी ः लक्ष्मण सवदी (भाजप), महेश कुमठळ्ळी (काँग्रेस), गिरीश बुटाळी (निजद), निंगाप्पा गुरव (प्रजा परिवर्तन पक्ष), महावीर मानोजी (एमईपी), विठ्ठल पुजारी, आण्णाराय हळल्ली, शिवमल्लप्पा कुली, गुरुनाथ कांबळे, जोतिबा जाधव, ए. पाटील, बसाप्पा हंचीनाळ, मेहबूब शेख, राजेश शिंगे, संजीव कांबळे 

कागवाड ः  श्रीमंत पाटील (काँग्रेस), कल्लाप्पा मगेण्णावर (निजद), राजू कागे (भाजप), दीवाकर पोतदार, भाऊसाब ढवळे, भिमगौड खोत, संजय होनहंडे, सरोजनी आरगे, उत्तम पाटील, गणपती बुटाळी, नासीरखान पठान, बाळासाहेब राव, मुरगेप्पा देवरेड्डी, डॉ. रिझवान बाळेकुंद्री, श्रीनिवास पाटील, सचिन अलगुडे, 

कुडची ः  अमित घाटगे (काँग्रेस), पी. राजीव (भाजप), राजेंद्र ऐहोळे (निजद), आण्णाप्पा ऐगळी, किरण अज्जाप्पगोळ, थावरसिंग राठोड, परशुराम शिंदे, राजू निप्पाणीकर, सदाशिव मांग, सुरेंद्र उगारे, अशोक गुप्ते, केंपान्ना मेत्री, जंगलू असोदे, जास्मीन अलासे, नरसप्पा तुलसीगेरी, बसवराज तलवार, महेंद्र तम्मन्नावर, योगेश रोडकर, रामाप्पा बजंत्री, संगीता कांबळे, संजीव कांबळे, सुरेश ऐहोळे, सुरेश तळवार 

हुक्केरी ः  ए. बी. पाटील (काँग्रेस), उमेश कत्ती (भाजप), रामचंद्र कम्मार (राष्ट्रवादी), मल्लिकार्जुन पाटील (निजद), सुभाष कासारकर (शिवसेना), इम्माहुसेन पीरजादे, एच. गिरीराज, नझीरएहमद मुल्ला, रामाप्पा कुरबेट्टी, शहाजहान भडगावी, संजीव मगदुम 

अरभावी ः  भालचंद्र जारकीहोळी (भाजप), अरविंद दळवाई (काँग्रेस), प्रकाश सोनवलकर  (निजद),   लक्ष्मण तोली (शिवसेना), अशोक हंजी, शंकरगौडा पडेसूर, चुनाप्पा पुजेरी, भिमाप्पा गडाद, भिमाप्पा नाईक, 

यमकनमर्डी ः  सतीश जारकीहोळी (काँग्रेस), मारुती अष्टगी (भाजप), डॉ. वाय. बी. नाईक (कजप), शंकर गस्ती (निजद), भिमाप्पा नाईक, सुरेश मुद्दापगोळ, रविंद्र नायकर 

गोकाक ः रमेश जारकीहोळी (काँग्रेस), अशोक पुजारी (भाजप), के. एल. तलवार (निजद), परवीन तंबुले (एमईपी), अनिल उपाध्ये, बाबू फनीबंद, रियाझएहमद पट्टद, श्रीनाथ कवलगी, सतीश पुजारी, सुरेश पाटील, संतोष पुजारी, हिडकल हुसेनसाब, 

बेळगाव दक्षिण ः  प्रकाश मरगाळे (म. ए. समिती), एम. डी. लक्ष्मीनारायण (काँग्रेस), अभय पाटील (भाजप), किरण सायनाक, किरण गावडे, पंढरी परब, रतन मासेकर, वर्धमान गंगाई, उमेश शर्मा, विजय पाटील, विनायक जाधव, श्रीनिवास टाळुकर, सुजित मुळगुंद, एन. एस. शंकराचार्य,  चांगदेव उर्फ महेश कुगजी (निजद), भुपाल अत्तू (कजप), सदानंद मेत्री (आप), महेश रंगत्तीमठ (एमईपी).स्नेहा चोडणकर, अनिता दोड्डमनी.

बेळगाव उत्तर ः  संभाजी पाटील (म. ए. समिती), फिरोज सेठ (काँग्रेस), अनिल बेनके (भाजप),  बाळासाहेब काकतकर, नारायण किटवाडकर, संतोष बावडेकर, अमर गोवे, अश्पाक मडकी (निजद), रहीम दोड्डमनी (रष्ट्रवादी), इस्माईल मगदूम, कुर्शीदबानू नदाफ, गणेश सिंगण्णावर, फकरूसाब नदाफ (आप), मोहम्मदरसूल बेपारी, सुवर्णा दोड्डमनी, संतोषकुमार के. 

बेळगाव ग्रामीण ः  मनोहर किणेकर (म. ए. समिती), संजय पाटील (भाजप), लक्ष्मी हेब्बाळकर (काँग्रेस), शिवनगौडा पाटील (निजद), अन्वर जमादार, सदानंद भातकांडे, मनोज पावशे, मोहन मोरे, मोहन बेळगुंदकर, यल्लाप्पा रजनीश, लक्ष्मण बोमन्नावर, लक्ष्मण होनगेकर, सुनील अष्टेकर, 
सतीश गुडगेनहट्टी, मोहम्मदरफीक मुल्ला,  

खानापूर ः अरविंद पाटील (म. ए. समिती), अंजली निंबाळकर (काँग्रेस), विठ्ठल हलगेकर (भाजप), नासीर बागवान (निजद), विलास बेळगावकर, मेघना देसाई, यशवंत निप्पाणीकर, उत्तमकुमार बापशेठ, कृष्णाजी पाटील, जोतिबा रेमाणी, भरमाणी पाटील, महादेव शिंदोळकर, मुरलीधर पाटील, यल्लाप्पा बेळगावकर, लक्ष्मण बन्नार, शिवाजी पाटील, श्रीकांत बजंत्री, सुरेश देसाई. 

कित्तूर ः डी. बी. इनामदार (काँग्रेस), महांतेश दोड्डगौडर (भाजप), सुरेश मारिहाळ (निजद), आनंद हंप्पन्नावर (आप), तंग्येव्वा इरगार (एमईपी), महांतेश पोटकट, सिद्धाप्पा डी. अशोक नाईक, उरवेप्पा उळवी, बाबासाहेब पाटील, बाबू हाजी, राघवेंद्र नाईक, राजासलीम काशीमन्नावर. 

बैलहोंगल ः महांतेश कौजलगी (काँग्रेस), विश्‍वनाथ पाटील (भाजप), शंकर मडलगी (निजद) यांच्यासह सहा अपक्ष 

सौंदत्ती ः आनंद मामनी (भाजप), विश्‍वास वैद्य (काँग्रेस), दोड्डगौडा पाटील (निजद), महेश अंगडी (राष्ट्रवादी), ईश्‍वर मेलगेरी (संयुक्त जद) यांच्यासह पाच अपक्ष 

रायबाग ः दुर्योधन ऐहोळे (भाजप), प्रदिपकुमार माळगी (काँग्रेस), राजीव कांबळे (बसप), नीलाप्पा जी. (राष्ट्रवादी), सुरेश होसमनी (शिवसेना), मंजुळा असोदे (भारीप), गजेंद्र होनोले, प्रकाश महिशाळे, त्यागराज कदम, सुरेश तळवार, अनंतकुमार ब्यॅकूड, अनंत मोहिते, अप्पण्णा कंगण्णावर, अशोक दंडेन्नावर, के. एम. हिरेमठ, प्रभाकर गगरी, भीमसेन सनदी, महावीर मोहिते, रामण्णा पत्रोट, वासुदेव मोटण्णावर, सुकुमार किरणगी, सुरज पिराप्पागोळ, 

विधानसभेसाठी 3374 अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारी अखेरच्या दिवसापर्यंत 224 जागांसाठी 3374 अर्ज दाखल झाले आहेत. 

काँग्रेसतर्फे 282, भाजपतर्फे 250, निजद 231 व अपक्ष 1673 असे अर्ज दाखल झाले आहेत. अर्जांची छाननी बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे वैध व अवैध अर्जांसंबंधी माहिती उपलब्ध होऊ शकले नाही. गुरुवारी (दि. 26) सकाळी राज्य निवडणूक आयोग कार्यालयातून ही माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. 27 ही अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख आहे. अनेक मतदारसंघांत विद्यमान मंत्री, आमदारांनी अर्ज दाखल केलेले आहेत.