Thu, Feb 21, 2019 11:06होमपेज › Belgaon › पोस्टमास्तरकडून २५ लाखांचा गंडा

पोस्टमास्तरकडून २५ लाखांचा गंडा

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 12:32AMबेळगाव : प्रतिनिधी

तवंदी येथील पोस्टमास्तरने गावातील ठेवीदारांना सुमारे 25 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत ठेवीदारांनी निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुरुवारी सायंकाळी तक्रार नोंदवली.

तवंदी पोस्टात ठेवीदारांनी एक वर्षापासून 10 वर्ष मुदतीपर्यंतच्या ठेवी ठेवल्या होत्या. मात्र, त्यांना बनावट पासबुक देऊन ही रक्‍कम परस्पर लाटण्यात आली. मुदतपूर्ती झाल्यानंतर ठेवीदार ठेव परत घेण्यास गेले असता हा प्रकार उघडकीस आला. डिसेंबर 2017 मध्ये याबाबत ठेवीदारांनी पोस्टमनकडे चौकशी केली. त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली होती.

त्यामुळे ठेवीदारांनी निपाणी, चिकोडी पोस्ट कार्यालयात घटनेची माहिती दिली. त्यावेळी सदर पोस्टमनला निलंबित केल्याचे सांगण्यात आले. सीपीआय मुत्ताण्णा सरवगोळ, पीएसआय निंगनगौडा पाटील यांच्या सूचनेनुसार रात्री उशिरार्पंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. संजय सुतार, प्रकाश पाटील, सचिन पाटील, मधुकर पाटील, अनिल गुरव, संजय पाटील, आनंदा पाटील, दत्तात्रय पाटील यांच्यासह ठेवीदार उपस्थित होते.

 

Tags : belgaon, belgaon news, crime, Tawndi crime, postmaster, cheats,