Sun, Nov 18, 2018 12:02होमपेज › Belgaon › 22 टन सुपारीचा ट्रक ताब्यात

22 टन सुपारीचा ट्रक ताब्यात

Published On: Mar 18 2018 11:39PM | Last Updated: Mar 18 2018 11:36PMबेळगाव : प्रतिनिधी 

सर्व प्रकारचे सरकारी कर चुकवून  बंगळूरहून गुजरातकडे 22 टन सुपारीची वाहतूक करणारा ट्रक निपाणीच्या विक्री कर विभागाने ताब्यात घेतला. ही कारवाई शनिवारी मध्यरात्री तवंदी घाट उतारावरील हॉटेल अमरसमोर विशेष शोध पथकाने  केली. ट्रक शहर पोलिसांच्या ताब्यात दिला. ट्रकमधून चालक हुसेन बंगळूरहून पान मसाला वापरासाठी लागणारी सुपारी घेऊन गुजरातला जात होता. याची माहिती विक्री कर विभागाला मिळाली.

जिल्हा विक्री कर कार्यालयाच्या सूचनेनुसार सहायक आयुक्‍त हजरतअली देगीनहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री 2.30 च्या सुमारास पथकाने पाळत ठेवली. चालक हुसेनला ट्रक थांबविण्याची  सूचना दिली. पथकाने चालकाकडे कर भरणा कागदपत्राची मागणी केली असता ती नव्हती. पथकाने ट्रक शहर पोलिसांच्या ताब्यात दिला.