Wed, Nov 21, 2018 07:10



होमपेज › Belgaon › गोव्याचे २ युवक अपघातात ठार

गोव्याचे २ युवक अपघातात ठार

Published On: May 14 2018 1:42AM | Last Updated: May 14 2018 12:27AM



बेळगाव  : प्रतिनिधी

विवाह समारंभ संपवून गोव्याला परत जाणार्‍या दोघा तरुणांचा खानापूर?गोवा रोडवरील बैलूर क्रॉस येथे अपघातात मृत्यू  झाला. ही दुर्घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. महम्मद अन्वर शेख (वय 20), दीपसन बाबुराव सोनी (वय 19, दोघे रा. मुस्लिम वाडा, गोवा) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

हे तरुण गोव्याहून बेळगावला एका विवाह समारंभासाठी आले होते. विवाह समारंभ आटोपून ते परत गोव्याला दुचाकीवरून जात होते. रात्री  7.30 वा. ते बैलूर क्रॉस येथे आले असता, गोव्याकडे जाणार्‍या स्कॉर्पिओ कारने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये दोघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना 10.30 वा. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची नोंद खानापूर पोलिस स्थानकात झाली आहे. धडक दिल्यानंतर स्कॉर्पिओ चालक फरार झाला असून, पोलिसांकडून स्कॉर्पिओचा शोध घेण्यात येत आहे.