Sun, Oct 20, 2019 11:26होमपेज › Belgaon › लग्नाच्या वाढदिनीच काळाचा घाला

लग्नाच्या वाढदिनीच काळाचा घाला

Published On: Apr 30 2018 1:42AM | Last Updated: Apr 29 2018 11:52PMबेळगाव : प्रतिनिधी

नात्यामधील लग्नसमारंभ आटोपून आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जाणार्‍या दोन तरुण अभियंत्यांचा शनिवारी (दि. 28) अपघाती मृत्यू झाला. देसूर क्रॉसजवळ रात्री 9 वाजता ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात समोरून येणार्‍या बसला दुचाकीची धडक बसल्याने हा अपघात घडला.

प्रशांत रामा कोटगी (30, रा. भवानीनगर, बेळगाव) व प्रमोद विजय जाधव (27, रा. संभाजीनगर, वडगाव) अशी आहेत. प्रशांत व प्रमोद बेळगावमध्ये नातेवाईकांच्या लग्नसमारंभाला आले होते. प्रशांतच्या लग्नाचा वाढदिवस शनिवारी होता. तो साजरा करण्यासाठी ते लग्न समारंभ आटोपून प्रशांतची सासुरवाडी बरगाव (ता. खानापूर) येथे जात होते. 

घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिस स्थानकात झाली आहे. प्रशांत हा इलेक्ट्रिक अभियंता म्हणून पुण्यात सेवा बजावत होता. प्रवीण बेळगावातील खासगी कंपनीत होता. 

केक रक्ताच्या थारोळ्यात...

सरप्राईज गिफ्ट देण्याच्या उद्देशाने प्रशांत आणि प्रमोद बरगावला जात होते. वाढदिवस साजरा करण्यासाठी सोबत केक घेतला होता. अपघाताच्या ठिकाणी केक रक्ताच्या थारोळ्यात विखुरला होता. हे दृश्य पाहणार्‍यांचे डोळे पाणावले.