Thu, Jan 24, 2019 03:30होमपेज › Belgaon › कुद्रेमानीत २ सिलिंडर स्फोट

कुद्रेमानीत २ सिलिंडर स्फोट

Published On: Jan 11 2018 1:05AM | Last Updated: Jan 11 2018 12:07AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास शार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन सिलिंडरचा स्फोट होऊन लाखो रुपयांची हानी झाली. दागिने, धान्य, कपडे, संसारोपयोगी वस्तू, तसेच पावणदोन लाख रुपये रोख जळून खाक झाले. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे जीवितहानी झाली नाही.

मर्‍याप्पा लक्ष्मण पाटील, दीपक पांडुरंग पाटील, मारुती महादेव पाटील, शांताराम कल्लाप्पा पाटील यांच्या घरांना ही आग लागली. मर्‍याप्पा व त्यांच्या भावाच्या घराला उच्चदाबाच्या वीजपुरवठ्यामुळे शार्टसर्किट होऊन आग लागली. हा प्रकार लक्षात येताच घरातील लोक बाहेर पळाले. इतक्यात, स्वयंपाक खोलीतील दोन सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे आग भडकली व बाजूला असणार्‍या शांताराम पाटील यांच्या घराला ज्वालांनी घेरले. दोन्ही घरांची छपरे खाक झाली.

सिलिंडर स्फोटाची तीव्रता इतकी होती की, सोन्या-चांदीचे दागिने वितळून गेले. तसेच बोअरवेल खोदाईसाठी ठेवण्यात आलेली एक लाख 65 हजारांची  रोकड, कपडेलत्ते, साठविलेले भात जळून खाक झाले. भिंतींनाही तडे गेले. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून घरातील जनावरे बाहेर काढली.