होमपेज › Belgaon › निपाणी तालुक्याची 2,70,259 लोकसंख्या

निपाणी तालुक्याची 2,70,259 लोकसंख्या

Published On: Jan 03 2018 1:10AM | Last Updated: Jan 03 2018 12:41AM

बुकमार्क करा




निपाणी ः महादेव बन्‍ने

राज्य शासनाकडे आवश्यक असणार्‍या तांत्रिक बाबी पूर्ण होऊन तालुका निर्मितीची फाईल गेल्याने, निपाणी तालुका घोषित होण्याचा मार्ग मोकळा झाला. 2011 च्या जनगणनेनुसार संभावित नव्या निपाणी तालुक्याची 2,70,259 इतकी लोकसंख्या असणार आहे.

निपाणी विधानसभा मतदारसंघात येणार्‍या 55 गावांचा या नव्या निपाणी तालुक्यात समावेश असणार आहे. तालुक्यातील सर्वात मोठे गाव निपाणी असणार असून याची लोकसंख्या 62,825 इतकी आहे. तर सर्वात लहान गाव म्हणून दिलालपूरवाडी असणार आहे. या गावची लोकसंख्या 940 इतकी आहे. निपाणी तालुका होण्यासाठी आवश्यक असणार्‍या सर्व बाबींची पूर्तता करण्यात येत असून, मिनी विधानसौधची निर्मिती होऊपर्यंत तालुका कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात येथील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये सुरु होणार आहे. यासाठी निपाणी नगरपालिकेने प्रशासनास अनुमती दिली आहे. 

या तालुक्यामध्ये निपाणी, कोगनोळी, हणबरवाडी, जत्राट, श्रीपेवाडी, लखनापूर, पडलिहाळ, शिरगुप्पी, पांगिरे बी, बुदलमुख, कोडणी, गायकनवाडी, शेंडूर, गोंदुकुप्पी, सौंदलगा, भिवशी, आडी, हंचिनाळ, कुर्ली, भाटनांगनूर, यरनाळ, अमलझरी, तवंदी, गवाण, आप्पाचीवाडी, मत्तिवाड, हदनाळ, सुळगांव, अकोळ, यमगर्णी, नांगनूर, बुदिहाळ, बेनाडी, बोळेवाडी, बोरगाव, बेडकिहाळ, सिदनाळ, कुन्नूर, गजबरवाडी, शिवापूरवाडी, माणकापूर, हुन्नरगी, भोज, शिरदवाड, गळतगा, भीमापूरवाडी, दिलालपूरवाडी, हळदहट्टी, ममदापूर, कारदगा, ढोणेवाडी, बोरगाववाडी, कसनाळ, बारवाड, मांगूर या 55 गावांचा समावेश असणार आहे. आता  गॅझेट निघून तालुका अस्तित्वात कधी येतो याकडे सगळ्यांचे डोळे लागून आहेत.