Wed, Jun 26, 2019 11:37होमपेज › Belgaon › ‘एपीएमसी’त गाळ्यांसाठी 182 अजर्र्

‘एपीएमसी’त गाळ्यांसाठी 182 अजर्र्

Published On: Aug 25 2018 1:13AM | Last Updated: Aug 24 2018 7:55PMबेळगाव : प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) गाळ्यांसाठी अर्ज देण्यास काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.  आतापर्यंत 132 गाळ्यांसाठी 182 अर्ज आले आहेत.  सुमारे दोनशेचा अकडा पार होईल. 

सी ब्लॉकमधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. यासाठी आतापर्यंत 41 अर्ज आले असून  25 ऑगस्ट ही अर्ज देण्याची  अंतिम मुदत आहे. ए  ब्लॉकमधील गाळे खरेदी देण्यात येणार आहेत. यासाठी 41 अर्ज आले आहेत.  बी ब्लॉकसाठी 96 अर्ज आले आहेत. अर्ज देण्यासाठी 27 ऑगस्टपर्यंत डीडी भरून देता येईल. निविदा अर्ज मिळविण्याची 8 सप्टेंबर मुदत आहे. 19 सप्टेंबरला ब्लॉक ए मधील गाळ्यांचा लिलाव होणार आहे. 22 सप्टेंबर रोजी सी ब्लॉकमधील गाळ्यांचा लिलाव होईल. 24 सप्टेंबरला बी ब्लॉक मधील गाळ्यांचा लिलाव होणार आहे. 

येथील गाळे पहिल्यांदा भाडेतत्त्वावर दिल्यास बाजारपेठ दिमाख्यात  उभी राहील. एपीएमसीत भाजी मार्केट सुरू व्हावे, ही सर्वांची इच्छा आहे. यासाठी एपीएमसीत व्यापार्‍यांनी निविदामध्ये भाग घेऊ नये. त्यांचा अर्ज घेऊ नये. कारण  किल्ला येथील व्यापारी अडचणीत येतील. कोट्यवधी रुपये खर्चून भाजी मार्केट उभारले आहे. 

पहिल्यांदा भाजी मार्केट सुरू करा, अशी मागणी एपीएमसीत व्यापार्‍यांनी केली आहे. किल्ला येथील व्यापार्‍यांना प्राधान्य द्या, असा  निर्णय एकमताने व्यापार्‍यांनी घेतला आहे.  निविदाही किचकट आहे. ती भरताना उलट-सुटल चर्चा होत आहे. निविदा प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी व्यापारीवर्गातून होत आहे. काही गाळे राखीव ठेवले.किल्ला होलसेल भाजी मार्केटमधील व्यापार्‍यांनी  एका हॉटेलमध्ये बैठक घेतली आहे. यामध्ये एपीएमसीत गाळे घ्यायचे की नाही, त्या संदर्भात चर्चा झाली. 

व्यापार्‍यांनी निविदेत भाग घेऊ नये

एपीएमसीतील व्यापार्‍यांनी भाजी मार्केटच्या निविदेत भाग घेऊ नये. त्यासाठी एपीएमसीत व्यापारी, सदस्य व सचिव यांची नुकतीच बैठक झाली आहे. तेथील अर्ज स्वीकारू नये. किल्ला व्यापार्‍यांनाच प्राध्यान्य देण्यात येईल, असे सचिव गुरु प्रसाद यांनी सांगितले.