Fri, Jul 19, 2019 20:57होमपेज › Belgaon › १८ पोलिस उपनिरीक्षक पूर्ववत ठिकाणी

१८ पोलिस उपनिरीक्षक पूर्ववत ठिकाणी

Published On: Jun 17 2018 1:35AM | Last Updated: Jun 16 2018 10:45PMनिपाणी : प्रतिनिधी 

उत्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक  अलोककुमार यांनी जिल्ह्यातील  18 पोलिस उपनिरीक्षक  (सब इन्स्पेक्टर) दर्जाच्या अधिकार्‍यांना स्थलांतरित मूळ जागी रूजू होण्याचा आदेश शुक्रवारी रात्री उशिरा जारी केला.

निपाणी सर्कलमधील बसवेश्‍वर चौक स्थानक उपनिरीक्षकपदी    रोहिणी पाटील, खडकलाट स्थानक बसगौडा पाटील यांची तर शहर स्थानकाच्या गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षक पदी एस. जी. खानापुरे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. शहर स्थानकाच्या उपनिरीक्षकपदी कार्यरत अशोक चव्हाण यांचीहा बदली आदेशात समावेश असल्याने शहर स्थानकाचे फौजदारपद पुन्हा एकदा  रिक्त  झाले आहे. दरम्यान, वरील तीनही अधिकारी आपल्या पदाचा येत्या दोन दिवसात पूर्ववत कार्यभार स्वीकारणार आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संबंधित अधिकार्‍यांचे कार्यक्षेत्र जिल्हा निकषाच्या आधारे तात्पुरत्या बदल्या  झाल्या होत्या. विधानसभा निवडणूक होऊन महिना लोटला तरी संबंधित अधिकार्‍यांना मूळ ठिकाणी पाठविण्यात आले नव्हते. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांची मोठी अडचण झाली होती.पंधरवड्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने संबंधित अधिकार्‍यांना मूळ ठिकाणी पाठवा, असे पत्र राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले होते. मात्र नव्या सरकारचा शपथविधी व राज्यात अनेक ठिकाणच्या पोटनिवडणुकांमुळे संबंधित अधिकार्‍यांना मूळ ठिकाणी पाठविले नव्हते.

दरम्यान, गुरूवारी पूर्ववत बदलीचे आदेश देण्यात आले.त्यानुसार राज्याच्या पोलिस महानिरीक्षक  निलमनी राजू यांनी पहिल्या टप्प्यात डीएसपी व सीपीआय दर्जाच्या 385 अधिकार्‍यांचे बदली आदेश काढले. अर्थात डीएसपी व सीपीआय दर्जाच्या बदल्यांसह नेमणुकीचा आदेश  जारी करण्याचा अधिकार राज्यपातळीवर होतो. तर उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांसह नेमणुकीचा अधिकार हा जिल्हा पातळीवरील वरिष्ठांना असतो. त्यानुसार  आयजीपी अलोककुमार यांनी शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील 18 अधिकार्‍यांना मूळ ठिकाणी रूजू होण्याचे आदेशआहे. 

शुक्रवारी प्राप्त झालेल्या बदली आदेशातील शहर स्थानकाचे उपनिरीक्षक चव्हाण यांची पूर्ववत बागलकोट, बसवेश्‍वर चौक स्थानकाचे रायगौंडा जानर, खडकलाटचे सी.बी.बागेवाडी यांची पुन्हा गोकाक व विजापूर स्थानकात नियुक्ती झाली आहे.